पदनिश्चित करून कायम नियुक्ती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:34 PM2019-08-21T23:34:37+5:302019-08-21T23:35:50+5:30
सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून पद निश्चित करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
निवेदनात, सर्व संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून संगणक परिचालक पद निश्चित करु न कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी, शासनाच्या निर्णयानुसार सर्व संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे थकित व चालू मानधन एका निश्चित तारखेलाच द्यावे, जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील ग्राम चोरखमारा येथील ग्रामसेवक प्रशासकीय कार्यवाही करणे तसेच आमगाव तालुक्यातील ग्राम रामाटोला व अंजोरा येथील संगणक परिचालकांना नियुक्ती द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) व प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामिण) आॅनलाईन रजिस्ट्रेशनचा मोबदला यासह आवास प्लस सर्व्हेचा मोबदला मिळावा, शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या कामाकरिता जबरदस्ती करू नये, शासकीय सुटीच्या दिवशी कामाची जबरदस्ती करु नये, जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी शासनाने मंजुरी दिल्याने त्यांची नियुक्ती करावी आदि मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी बुधवारपासून (दि.२१) राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, येथील गटविकास अधिकारी एस.एम.लिल्हारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुकाध्यक्ष रोहीत एस. पांडे, उपाध्यक्ष प्रिती धमगाये, सचिव अमोल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन कटरे, भूवन राऊत, कृष्णा टेंभरे, कलींदर आझाद मेश्राम, अनिल पटले. मिथलेश पारधी, तेजराम राऊत, दिक्षीत बघेले, देवेंद्र बिसेन, तिरंजीव कटरे, ममता रहांगडाले, ज्योती पटले, मिना पटले, भुमेश्वरी ठाकरे यांच्यासह अन्य संगणक परिचालक उपस्थित होते.