योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:10 PM2018-11-24T22:10:52+5:302018-11-24T22:11:11+5:30
काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही. त्यात या गरजुपर्यंत योजना पोहोचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रक्रीया सुलभ करण्याची गरज असून ही बाब शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ग्राम फुलचूरपेठ येथे आयोजीत वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच पुष्पलता मेश्राम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वैयक्तीक योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. समाजातील अंतीम व्यक्तीपर्यंत योजना पोहचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, स्नेहा गौतम, योगराज उपराडे, प्रकाश रहमतकर, अशोक लिचडे, अशोक इटानकर, अरूण दुबे, जिवन बंसोड, उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवि बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशिने, मनीष गौतम, लक्ष्मी निर्वीकार, शिवराम सव्वालाखे, महेंद्र सोनवाने, महफुस पठाण, संजय वैद्य, साहिस्ता शेख, देवचंद चोपकर, कैलाश उईके, पुरूषोत्तम भांडारकर, महादेव दहीकर, राजेश उईके, प्रभू पुराम, दिनेश गौतम, मुकेश लिल्हारे, दादू ठाकरे, भरत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.
अर्जदारांना त्रास देऊ नका
आमदार अग्रवाल यांनी, गरीब नागरिक अगोदरच आपल्या समस्यांनी ग्रस्त असतात. यामुळेच ते शासकीय योजनांना आधार घेण्यासाठी येतात. यामुळे योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या गरजु अर्जदारांना टोलवाटोलवी करुन त्रास देऊ नका अशा सूचना शिबिराला उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले. शिबिरात २५० हून अधीक अर्ज प्राप्त झाले. सर्वाधीक ५५ रेशनकार्ड, ७० उत्पन्नाचे दाखले, २७ संजय गांधी व श्रावण बाळ योजना, १३ मतदानकार्ड व २७ शासकीय चिकीत्सक प्रमाणपत्राचे अर्ज आहेत.