दुय्यम सेवापुस्तक शिक्षकांना उपलबद्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:31 AM2021-02-11T04:31:27+5:302021-02-11T04:31:27+5:30

गोरेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोरेगावच्या शिष्टमंडळाने ए.डी. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी एन.जे. सिरसाटे यांची ...

Make secondary service books available to teachers | दुय्यम सेवापुस्तक शिक्षकांना उपलबद्ध करून द्या

दुय्यम सेवापुस्तक शिक्षकांना उपलबद्ध करून द्या

googlenewsNext

गोरेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोरेगावच्या शिष्टमंडळाने ए.डी. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी एन.जे. सिरसाटे यांची विविध समस्यांच्या अनुषंगाने भेट घेतली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दुय्यम सेवापुस्तक शिक्षकांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

समितीच्या सदस्यांनी यावेळी गटशिक्षणाधिकारी सिरसाटे यांच्यासोबत जीपीएफ, डीसीपीएसधारकांच्या सहाव्या वेतन आयोगाचे संपूर्ण ५ हप्ते सेवा पुस्तकात नोंदी पडताळणी करणे व नसल्यास तातडीने नोंदी घेणे, ज्या शिक्षकांचे हप्ते सेवा पुस्तकात नोंद नाहीत त्यांनी संघटनेशी संपर्क करून केंद्रनिहाय शिक्षकांच्या नोंदी पूर्ण करून देण्याचे आश्वासन सिरसाटे यांनी दिले. सेवा पुस्तकात सर्वच नामनिर्देशनाची नोंद घेणे याबाबतीत नामनिर्देशनाचे सर्व प्रपत्र भरून केंद्रानिहाय संघटनेकडे जमा करावे. नामनिर्देशनाची नोंद करून स्वाक्षरी करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती वित्त विभागातून प्रमाणित करण्यासाठी सेवापुस्तक जिल्हा परिषदेला पाठवणे, दुय्यम सेवापुस्तक शिक्षकांना उपलब्ध करून देणे, तातडीने स्वीकार करून दुय्यम सेवा पुस्तकावर स्वाक्षरी करून देण्याचे मान्य केले. चट्टोपाध्याय, निवडश्रेणी, कायमतेचे, हिंदी मराठी सूट, तसेच पूर्वपरवानगी, कार्योत्तर परवानगी, क प्रस्ताव तातडीने निकाली काढणे यावरही तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात अभय बिसेन, रामेश्वर गोन्नाडे व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Make secondary service books available to teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.