एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30

जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावकºयांशी संवाद साधला. पुरामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात पुरामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली.

Make sure no one is left out | एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घ्या

Next
ठळक मुद्दे प्रफुल्ल पटेल । पूरबाधित भागाची केली पाहणी,अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर हजारो हेक्टरमधील धान पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पूर बाधितांना शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नुकसान भरपाईपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची काळजी घेत वस्तूनिष्ठ आणि कुठलाही भेदभाव न करता सर्वेक्षण करुन मदत द्यावी असे निर्देश खा.प्रफुल्ल पटेल यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून याचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना बसला. शनिवारी (दि.५) खा.प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील पूर बाधित गावांची पाहणी करुन तेथील गावकºयांशी संवाद साधला. पुरामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जात पुरामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली. तसेच उपस्थित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानीचे योग्य सर्वेक्षण करुन एकही पूर बाधित व्यक्ती शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
तसेच नुकसानग्रस्तांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्यातून गावातील कोणत्या व्यक्तीचे नाव सुटू नये यासाठी या नुकसानग्रस्तांच्या याद्यांचे तलाठी, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापकांनी चावडी वाचन करावे. त्यामुळे एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही.
पुरामुळे ज्यांच्या घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल देण्यात यावे. याचे प्रस्ताव त्वरीत तयार करुन पंचायत समितीकडे पाठविण्यात यावे. ज्यांच्या घरांची अशंता पडझड झाली आहेआणि ज्यांच्या घरात पुराचे पाणी साचल्याने नुकसान झाले. त्यांना खावटी मदत आणि नुकसान भरपाई त्वरीत देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. द्रारिद्रय रेषेखालील आणि निराधार कुटुंबांना सुध्दा शासनाच्या निकषानुसार त्वरीत मदत देण्याचे निर्देश त्यांनी तहसीलदारांना दिले. या वेळी त्यांनी मुरदाडा, महालगाव, लोधीटोला,धापेवाडा, किन्ही गावांना भेट देवून नुकसानीची पाहणी केली. यंत्रणेला युध्द पातळीवर पंचनामे पूर्ण करुन त्वरीत मदत देण्यास सांगितले. या वेळी त्यांच्यासोबत माजी आ.राजेंद्र जैन, माजी खा.खुशाल बोपचे, रॉष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, विनोद हरिणखेडे, घनश्याम मस्करे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, देवेंद्रनाथ चौबे, राजू एन. जैन, जितेश टेंभरे, कल्लू मस्करे, प्रदीप रोकडे, निरज उपवंशी, महेंद्र बघेले, गोविंद तुरकर, सुनील पटले, रवि कावरे, जितेंद्र मेश्राम उपस्थित होते.

Web Title: Make sure no one is left out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.