गणपतीचा प्रसाद बनवताय; परवानगी घेतली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:42 PM2024-09-12T13:42:52+5:302024-09-12T13:43:59+5:30

गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसादाचे वितरण: अन्न व औषध प्रशासनाची नजर

Making Prasad of Lord Ganesha; have you taken permission for it? | गणपतीचा प्रसाद बनवताय; परवानगी घेतली आहे का?

Making Prasad of Lord Ganesha; have you taken permission for it?

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
जिल्ह्यातील गणेशोत्सवाची परिसरासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. हेच कारण आहे की, येथील गणेशोत्सवाची भव्यता बघण्यासाठी दूरवरून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येतात, या भाविकांसाठी बहुतांश मंडळांकडून महाप्रसादाचे सोय केली जाते. यामध्ये भाविकांना मंडप परिसरातच प्रसाद खाण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय, डब्यांच्या स्वरूपातही प्रसाद उपलब्ध करून दिला जातो.


प्रसाद वितरण करायचा म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाची गरज असते. त्यानुसार, मंडळांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते व त्यानंतरच ते प्रसाद वितरित करू शकतात. यंदाही शहरात गणेशोत्सवाची धूम असून कित्येक मंडळांकडून 'भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र असे करताना मंडळांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत काळजी घेणे गरजेचे आहे. 


जिल्ह्यात हजारावर गणेश मंडळांची नोंदणी 
जिल्ह्यात गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला जात असून शहरासह ग्रामीण भागातही याची धूम असते. हेच कारण आहे की, येथील गणेशोत्सव प्रसिद्ध असून भाविकांची गर्दीही दिसून येते. गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना पोलिससह अन्य विभागांची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार, जिल्ह्यात हजारावर सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो.


अन्न व औषध प्रशासनाची परवानगी गरजेची 
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून भाविकांना महाप्रसाद वितरित केला जातो. यासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी गरजेची असते. अन्न व औषध प्रशासनाकडून ५ वर्षांसाठी ही परवानगी दिली जाते. त्यानुसार मंडळांकडे जुनी परवानगी असावी. मात्र यंदा नव्याने एकाही मंडळाने अर्ज केलेला नाही.


प्रसाद बनवताना काय काळजी घ्याल?
प्रसाद तयार करताना स्वच्छता बाळगावी
मंडळांकडून भाविकांसाठी प्रसाद तयार करताना प्रसाद तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी. तयार केलेला प्रसाद काचेच्या झाकणात किवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. जेणकरून प्रसादाला धूळ, माती, माश्या, मुंग्या व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नये.

हातमोजे व स्वच्छ कापडांचा वापर करावा. 
प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत. त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुऊनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे, शिकणे, धुंकणे, नाक शिकरणे, तंबाखू वा धूम्रपान करणे टाळावे. त्यांची नखे व्यवस्थित कापलेली असावी व त्यात घाण साचलेली असू नये. हात पुसण्यासाठी स्वच्छ कापडांचा वापर करावा. 


परवानाधारक दुकानातूनच खरेदी करा
प्रसादासाठी कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी परवा- नाधारक दुकानदाराकडूनच करावी. खरेदी केलेल्या सामानाची बिले सांभाळून ठेवावी. जास्तीत जास्त कच्चे धान्य पाकीटबंद खरेदी करावे. सुटे धान्य खरेदी करणे टाळावे. तसेच खरेदी करताना पाकिटावर असलेली एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करावी.


"गणेशोत्सवात मंडळांकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. मात्र असे करताना मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेणे गरजेचे आहे. यामुळे मंडळांनी योग्यरीत्या परवाना घेऊन महाप्रसादाचे वाटप करावे."
- संजय शिंदे, उपायुक्त अन्न व औषध प्रशासन, गोंदिया

Web Title: Making Prasad of Lord Ganesha; have you taken permission for it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.