एक मच्छरने जिल्हे को हिला डाला! मलेरिया व डेंग्यू फोफावतोय, वेळीच उपाययोजना झाल्या गरजेच्या

By कपिल केकत | Published: August 10, 2023 07:56 PM2023-08-10T19:56:07+5:302023-08-10T19:56:42+5:30

डोळ्यांच्या साथीने जिल्ह्याला विळख्यात घेतले असतानाच आता डासांनीही आपली कमाल दाखविण्यास सुरुवात केली आहे.

Malaria and dengue are rampant, timely measures are necessary in gondiya | एक मच्छरने जिल्हे को हिला डाला! मलेरिया व डेंग्यू फोफावतोय, वेळीच उपाययोजना झाल्या गरजेच्या

एक मच्छरने जिल्हे को हिला डाला! मलेरिया व डेंग्यू फोफावतोय, वेळीच उपाययोजना झाल्या गरजेच्या

googlenewsNext

गोंदिया : डोळ्यांच्या साथीने जिल्ह्याला विळख्यात घेतले असतानाच आता डासांनीही आपली कमाल दाखविण्यास सुरुवात केली आहे. डासांचा प्रकोप वाढत चालला असून, यातूनच जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यू फोफावताना दिसत आहे. या वर्षातील सात महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यूचे २६ तर मलेरियाचे १०८ रुग्ण आढळून आहे आहेत. यामुळे जिल्हावासीयांना आता प्रशासनाच्या भरवशावर न राहता स्वत:च उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

काही वर्षांपूर्वी ‘साला एक मच्छर...’ हे गाणे चांगलेच गाजले होते. मच्छर हा जरी लहानसा कीटक असला तरी तो माणसाचा जीव घेऊ शकतो हेसुद्धा नाकारता येत नाही. हेच कारण आहे की, एवढ्या मोठ्या माणसालाही त्यापासून आपली सुरक्षा करवून भाग पडते. गोंदिया जिल्ह्यात बाराही महिने मच्छरांचा त्रास आहे. मात्र, पावसाळा म्हटला म्हणजे मलेरियाच्या मच्छरांसोबतच डेंग्यूच्या मच्छरांचीही पैदास होते. डेंग्यू म्हटला म्हणजे धडधड वाढू लागते; कारण, डेंग्यू अनेकदा जीवघेणा ठरतो. एवढे असूनही जिल्ह्याचा वाली कोणीही नसून आपली सोय आपणच करा, हे धोरण राबवावे लागते.

यंदाही जिल्ह्यात तीच स्थिती असून, या सात महिन्यांत जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात यात काही नवल नाही. मात्र यंदा गोंदिया शहरात तब्बल सात रुग्ण आढळून आले आहेत. यावरून नगर परिषद शहरवासीयांच्या आरोग्याची किती तत्परतेने काळजी घेत आहे याची प्रचिती येते.

सालेकसा तालुका मलेरियाचा अड्डा
जिल्ह्यात या सात महिन्यांत मलेरियाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, डासजन्य आजारांच्या बाबतीत सालेकसा तालुका पूर्वीपासूनच पुढे राहिला आहे. अशात यंदाही सालेकसा तालुका मलेरियाचा अड्डा बनला आहे. तालुक्यात तब्बल ५३ रुग्ण आढळून आले असून, त्यानंतच गोरेगाव तालुक्यात १४ तर देवरी तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले आहेत.

शहर व ग्रामीणमध्येच डेंग्यू वरचढ
जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण २६ रुग्ण आढळून आले असून, त्यात सात रुग्ण शहरातील तर सहा रुग्ण ग्रामीणमधील आहेत. यावरून गोंदिया शहर व ग्रामीण भागात डेंग्यू पाय पसरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे येथेच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असून, त्यामुळेच डेंग्यूचा धोका वाढताना दिसत आहे.

नगर परिषद आपल्यातच मस्त
 ग्रामीण भागात हिवताप नियंत्रण विभागाकडून डासजन्य आजार पसरू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात. तर शहरात नगर परिषदेची जबाबदारी असते. मात्र, गोंदिया नगर परिषदेला शहरातील जनतेशी काहीच घेणे-देणे नाही. हेच कारण आहे की, डासांचा नायनाट करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने शहरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळेच शहरवासीयांना आपली सुरक्षा आपणच करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील डेंग्यू व मलेरियाची आकडेवारी
तालुका - मलेरिया - डेंग्यू

  • गोंदिया शहर- ०१-०७
  • गोंदिया ग्रामीण - ०१-०६
  • तिरोडा - ०६-००
  • आमगाव - ०६-०४
  • गोरेगाव - १४-०१
  • देवरी - १३-००
  • सडक-अर्जुनी - ०६-०४
  • सालेकसा - ५३-०३
  • अर्जुनी-मोरगाव - ०७-०१

Web Title: Malaria and dengue are rampant, timely measures are necessary in gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.