मलेरिया कर्मचाऱ्यांचा पैसे कमाविण्यासाठी गोरखधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:26+5:302021-06-04T04:22:26+5:30
सडक-अर्जुनी : येथील मलेरिया विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य सोडून पैसा कमविण्यासाठी आता शासकीय योजनांमधून शस्त्रक्रिया करवून देण्याचे ...
सडक-अर्जुनी : येथील मलेरिया विभागातील काही कर्मचारी आपले कर्तव्य सोडून पैसा कमविण्यासाठी आता शासकीय योजनांमधून शस्त्रक्रिया करवून देण्याचे काम करीत आहेत. यासाठी ते गरिबांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला जात आहे.
तालुक्यातील काही मलेरिया कर्मचारी स्वतःचे कर्तव्य सोडून रुग्णांना इतर आजारासाठी इंजेक्शन लावणे, मूळव्याध, भगंदर, हायड्रोसील यासारख्या शस्त्रक्रियांचे रुग्ण शोधून त्यांच्याकडून पैसे घेऊन शासनाच्या योजनेतून मोफत ऑपरेशन करून देत आहेत. यावरून गरजूंकडून पैसे घेण्याच्या कामात काही मलेरिया कर्मचारी करीत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गरीब रुग्णांची पिळवणूक केली जात असतानाच याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दखल कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालय तर चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यात डव्वा, पांढरी, शेंडा व खोडशिवणी हे आहेत. आयुर्वेदिक दवाखाने मंदिटोला, घाटबोरी, बोपाबोडी येथे असून तालुक्यात २९ उपकेंद्र आहेत. अशात आता या कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.