जिल्ह्यात वाढले कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:35 PM2018-02-03T21:35:48+5:302018-02-03T21:36:03+5:30

कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात ‘वेट फॉर हाईट’ च्या दृष्टीने कुपोषित बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Malnutrition increased in the district | जिल्ह्यात वाढले कुपोषण

जिल्ह्यात वाढले कुपोषण

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वेट फॉर हाईट’ : कुपोषणात अजून ४२२ बालकांची भर

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात ‘वेट फॉर हाईट’ च्या दृष्टीने कुपोषित बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात अजून ४२२ कुपोषणग्रस्त बालक आढळले.त्यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ७२८ पैकी १ हजार १९६ अंगणवाडी मिनी अंगणवाडींचे शून्य ते ६ वर्ष वयोगटातील एक लाख १५० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ९८ हजार ४०९ बालकांचे वजन मोजण्यात आले. यापैकी ९१ हजार ९५५ (९३.४४) बालके सामान्य आढळले. तर ४२२ बालके कमी वजनाच्या श्रेणीत आढळले. ५ हजार ३७१ ( ५.४६ टक्के) वजन कमी असल्याचे आढळले.
१०८३ बालके तीव्र कमी वजनाचे आढळले. सॅम श्रेणीत १३९ (०.१४ टक्के) व व मॅम श्रेणीत ६४२ (०.६४) बालके आढळले. जिल्ह्यात ११७ बालके सॅम व ५०८ बालके मॅम श्रेणीत आढळले.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सॅम श्रेणीत ७९ व मॅम श्रेणीत २९० होते. जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १९९ सॅम-मॅम चे बालके आढळले. यानंतर सालेकसा तलुक्यात १२६, अर्जुनी-मोरगाव ११५, आमगाव ९०, गोरेगाव ८२, तिरोडा ७८, देवरी ५१ व सडक-अर्जुनी ४० बालके कुपोषित आढळले.
सर्वेक्षणात ८ हजार ४३९ गर्भवती व ९ हजार १९५ स्तनपान करणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात आली. यात ७ हजार ७३० (९१.६०) गर्भवती व ८ हजार ३२२ (९०.५१ टक्के) स्तनपान करणाऱ्या महिला सामान्य आढळल्या. १३८ महिला सॅम, ६४० महिला मॅम श्रेणीत आढळल्या. १५ महिला गंभीर स्थितीत आढळल्या. १९३ गंभीर आजाराच्या महिला आढळल्या.
८३३ बालके आढळले आजारी
आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७१ हजार १६३ बालकांची तपासणी करण्यात आली. यातील ६६ हजार ३२२ सामान्य आढळले. ८३३ बालकांना विविध आजाराने ग्रस्त आढळले. यातील २३० बालकांना ताप, ११० बालकांना हगवण, ५८ बालकांना चर्मरोग, २८ बालकांना निमोनिया, ३ बालकांना हद्यरोग, ३७ बालकांना दंतरोग, ३१ बालकांना कृमीरोग व ३ बालकांना कानाचा आजार असल्याचे पुढे आले.
वजन आणि उंचीवरुन ओळख
आईसीडीएसच्या सर्वेक्षणानुसार बालकांची यादी प्रकाशित केली जात आहे. या यादीनुसार न्यूट्रेशिन रिहबेट सेंटर (एनआरसी) व चाईल्ट ट्रीटमेंट सेंटर (सीटीआर) व गाव पातळीवर व्हीसीडीसीत दाखल करण्यात येते. ‘वेट फॉर हाईट’ च्या बालकांच्या आरोग्य विभागाच्या चमूतर्फे कुपोषित बालकांची ओळख निवड केली जाते. आधी ही बालके दिसत नव्हते. आरोग्य विभागाद्वारे कुपोषणावर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कुपोषित बालकांची ओळख पटविण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू होत आहे.

Web Title: Malnutrition increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.