तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना हिवतापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 08:56 PM2018-06-17T20:56:56+5:302018-06-17T20:56:56+5:30

तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.

Malnutrition infected laborers | तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना हिवतापाची लागण

तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांना हिवतापाची लागण

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांत १६ पॉझिटिव्ह : १९० दिवसांचा मलेरिया निर्मूलन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तेंदूपत्ता तोडण्यासाठी इतर राज्यांमध्ये गेलेल्या मजुरांवर आता जिल्हा मलेरिया विभागाची नजर लागून आहे. या मजुरांचा परतीचा प्रवास आता सुरू आहे. हे मजूर आपल्यासह मलेरियाचा आजार तर घेवून येणार नाही, याची चिंता विभागाला सतावत आहे.
दरवर्षी जिल्ह्यातील मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर राज्यांमध्ये जातात व तेथे ते जंगलातच राहतात. या दरम्यान डासांनी चावा घेतल्यामुळे त्यांना मलेरिया होत आहे. ते जेव्हा स्वगृही परततात तेव्हा ते मलेरियाचे रूग्ण असतात. परंतु याची माहिती त्यांना राहत नाही. त्यांचे शरीर तापलेले असते.
ज्यांचा वेळेवर उपचार होतो ते या आजारातून वाचतात. एकदा तर गोंदिया जिल्ह्यात केवळ एका वर्षात मलेरियामुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आता प्रयत्नातील सातत्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात मलेरियाच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नाही.
तेंदूपत्ता मजूर केवळ बाहेरील राज्यातच जात नाही तर जिल्ह्यातसुद्धा हजारो तेंदूपत्ता मजुरांना काम मिळत आहे. हे काम उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत होते.
त्यावेळी नाल्यांमध्ये पाणी वाहते राहत नाही. त्यामुळे शहरांमध्ये डासांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मेलेरिया आजाराचा प्रभावही दिसून येत नाही. परंतु जे मजूर तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात, ते जंगलात राहतात. तेथेच भोजन करतात व झोपतात. जंगलात वृक्षांवरून पाने पडण्याची एक प्रक्रिया सुरू असते. या पडलेल्या वाळल्या पानांमध्ये डासांचा प्रादुर्भाव होतो व डासांनी चावल्यामुळे मजुरांना मलेरिया होत आहे.
१९० गावांमध्ये फवारणी कार्यक्रम
जिल्हा हिवताप विभागाच्यावतीने या मजुरांच्या परतीच्या प्रवासाची वेळ बघता कीटनाशक फवारणी कार्यक्रम ११ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १९० गावांमध्ये सुरू आहे व ११ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. यात प्रामुख्याने आदिवासी गावांचा समावेश आहे. तसेच काही बिगर आदिवासी गावांचा समावेश आहे. तेंदूपत्ता तोडण्याच्या कामावरून परतलेल्या मजुरांना मलेरियाचे औषध कोणत्याही स्थितीत उपलब्ध व्हावे, या बाबीकडे सर्वेक्षणात विशेष लक्ष दिले जात आहे.
जून महिन्यात ९ पॉझिटिव्ह
मे २०१८ मध्ये जिल्ह्यात केवळ ७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु जून महिन्यात आतापर्यंत ९ मलेरिया बाधित आढळले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने फाईलेरिया, डेंग्यू व मलेरिया आजारांच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्या अंतर्गत डिजिटल बॅनर व पोस्टर्सचे वितरण प्राथमिक आरोग्य केंद्रांत करण्यात आले आहे.

Web Title: Malnutrition infected laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.