तीन वर्षाच्या चिमुकलीशी लैंगिक चाळे, आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 05:12 PM2022-03-30T17:12:55+5:302022-03-31T14:43:17+5:30

खेळता-खेळता लघुशंका करण्यासाठी गेलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील लैंगिक चाळे करणाऱ्या ५० वर्षाच्या इसमाला गोंदियाच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

man sentenced to life imprisonment for sexual abusing three-year-old girl | तीन वर्षाच्या चिमुकलीशी लैंगिक चाळे, आरोपीला जन्मठेप

तीन वर्षाच्या चिमुकलीशी लैंगिक चाळे, आरोपीला जन्मठेप

Next
ठळक मुद्देगोरेगाव तालुक्यातील घटना

गोंदिया : खेळता-खेळता लघुशंका करण्यासाठी गेलेल्या तीन वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील लैंगिक चाळे करणाऱ्या ५० वर्षाच्या इसमाला गोंदियाच्या जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही सुनावणी ३० मार्च रोजी जिल्हा न्यायाधीश-१ तथा विशेष सत्र न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी केली.

गोरेगाव तालुक्यातील आरोपी किसन भय्यालाल हरिणखेडे (५०) याने ४ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता ३ वर्षाची चिमुकली मैत्रिणीसोबत खेळत होती. खेळता-खेळता ती लघुशंका करण्यासाठी गल्लीमध्ये गेली असताना आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. तिने आपल्या आईला या घटनेसंदर्भात सांगितल्याने आरोपीच्या विरोधात गोरेगाव पोलिसात तक्रार करण्यात आली.

गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी तपास केला. याप्रकरणी सरकारी वकील कृष्णा डी. पारधी व जिल्हा सरकारी वकील महेश चंदवाणी यांनी १३ साक्षीदारांना न्यायालयासमोर तपासले. आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाल्याने तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ तथा विशेष सत्र न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीला कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, २०१२ प्रमाणे आजीवन सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम १० हजार रुपये पीडितेस देण्याचे आदेश दिले.

Web Title: man sentenced to life imprisonment for sexual abusing three-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.