मंडळ कार्यालयाकडून ‘पब्लिक डिमांड’ची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 09:26 PM2017-12-17T21:26:53+5:302017-12-17T21:27:45+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ कार्यालयाकडून गोंदिया रेल्वे स्थानकाबाबत ‘पब्लिक डिमांड’ काय आहे, याबाबत स्थानिक रेल्वे प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्याबाबत येथील जनतेच्या मागण्या मंडळ कार्यालयास कळविण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ कार्यालयाकडून गोंदिया रेल्वे स्थानकाबाबत ‘पब्लिक डिमांड’ काय आहे, याबाबत स्थानिक रेल्वे प्रशासनाला विचारणा करण्यात आली. त्याबाबत येथील जनतेच्या मागण्या मंडळ कार्यालयास कळविण्यात आल्या आहेत. मात्र पाठविण्यात आलेल्या अपेक्षांची पुतर्ता होणार काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
मंडळ कार्यालयाकडून प्रवाशांच्या समस्यांबाबत विचारपूस करण्यात आली. रेल्वे प्रवासी व स्थानिक नागरिक वेळोवेळी मांडत असलेल्या समस्या मंडळ कार्यालयास कळविण्यात आल्या. परंतु समस्यांचे समाधान कधी होईल, अशा तीव्र प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केल्या. मागील अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या दक्षिण (मार्केट) परिसरातील पार्किंगच्या व्यवस्थेवर प्रश्न उचलत आहेत. या विषयावर अनेकदा ‘लोकमत’ने बातम्यासुद्धा प्रकाशित केल्या आहेत. येथे दुसरे सायकल स्टँड देण्यात आले. परंतु कुणीही निविदा भरली नाही. तरीही सध्याच्या सायकल स्टँडच्या कर्मचाºयांवर संपूर्ण परिसरात पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांना उचलून नेणे व त्यांच्याकडून वसुली करण्याची तक्रार आहे.
याशिवाय दक्षिण भागात एफओबी, मल्टी फंक्शनल कॉम्प्लेक्स जवळील घाण, पुरी-दुर्ग एक्स्प्रेसचे गोंदियापर्यंत विस्तारीकरण, विदर्भ एक्स्प्रेसला होम प्लॅटफॉर्मवरून सोडणे, जनशताब्दी एक्स्प्रेसला शेगावपर्यंत वाढविणे, दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत गोंदिया-डोंगरगडच्या दरम्यान लोकल गाडी सुरू करणे, लोकमान्य तिलक-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेसचा थांबा देणे आदी स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मागण्या असल्याचे मंडळ कार्यालयाला स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
१ गुड्सशेड शिफ्टिंग वाद्यांत
रेल्वे स्थानकाच्या एका भागाकडे बनलेल्या गुड्सशेडच्या शिफ्टिंगची समस्या मोठी बिकट झाली आहे. या गुड्सशेडला एकोडी किंवा हिरडामाली येथे शिफ्ट करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून केले जात आहेत. नंतर गुड्सशेड हिरडामाली येथे शिफ्ट करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात आले. यानंतर गुड्सशेड हिरडामाली येथे शिफ्ट करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला. त्यासाठी जागासुद्धा ठरविली. यानंतर प्रयत्न थांबले. त्यामुळे जर रेल्वे विभाग प्रवाशांच्या समस्या सोडविण्याच्या दिशेने पाऊल उचलत नाही तर तक्रारी व जनतेच्या मागण्या कशासाठी मागवून घेत आहे, असा प्रश्न नागरिक व प्रवाशी उपस्थित करीत आहे.
२ एस्केलेटरचे उद्घाटन कधी?
गोंदिया रेल्वे स्थानकाला विकसित करण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्वयंचलित पायºया (एस्केलेटर), लिफ्ट व इतर सोयीसुविधा करण्यात येणार होत्या. सद्यस्थितीत केवळ होमप्लॅटफॉर्मवर एस्कलेटर बनून तयार आहे. टेस्टिंगची प्रक्रिया आटोपून तीन महिन्यांचा कालावधीही लोटला आहे. मात्र आतापर्यंत एस्कलेटरची सुविधा प्रवाशांना उपलब्ध होवू शकली नाही. या स्वयंचलित पायºयांचा शुभारंभ कधी होईल, असाही प्रश्न स्थानिक नागरिक व प्रवाशी करीत आहेत.