मृतांच्या श्रद्धांजलीसाठी मंत्रजाप व हवन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:41+5:302021-05-21T04:29:41+5:30

गोंदिया : कोरोनाच्या पहिल्या व आता दुसऱ्या लाटेमुळे कित्येक नागरिकांचा जीव गेला असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच कोरोनाचा ...

Mantra Jap and Havan for the Tribute of the Dead () | मृतांच्या श्रद्धांजलीसाठी मंत्रजाप व हवन ()

मृतांच्या श्रद्धांजलीसाठी मंत्रजाप व हवन ()

Next

गोंदिया : कोरोनाच्या पहिल्या व आता दुसऱ्या लाटेमुळे कित्येक नागरिकांचा जीव गेला असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच कोरोनाचा अवघ्या जगातून नाश व्हावा यासाठी येथील सर्व समाज मोक्षधाम सेवा समितीच्यावतीने गुरुवारी (दि.२०) मोक्षधाम येथील महाकाल मंदिरात मंत्रजाप व हवन करण्यात आले.

या मंत्रजाप व हवनातून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच कोरोनाचा अवघ्या जगातून नाश व्हावा यासाठी हवन करण्यात आले. मोठ्या संख्येत नागरिकांनी यामध्ये भाग घेत मृतांना श्रद्धांजली व कोरोना विनाशासाठी हवनात भाग घेतला. त्यानंतर हवनचे नगर भ्रमण करण्यात आले. याप्रसंगी बजरंग दल मुंबई क्षेत्र संयोजक देवेश मिश्रा, मनोज पारेख, पुष्पक जसानी, कशिश जायस्वाल, पंकज यादव, सचिन चौरसिया, कल्लू यादव, सुनील तिवारी, हरिश अग्रवाल, भूषण गिऱ्हे, दिलीप कुंगवाणी, अनिल मेश्राम, नितिन जिंदल, कृष्णा मिसार, बालू मेश्राम, छोटू डोहरे, समरित नशिने, गणेश जांगजोड, किशोर सोनवाने, तोलाराम मानकानी, बंटी मिश्रा, अमित जैन, त्र्यंबक जरोदे, योगेंद्र सोलंकी, रत्नेश चौधरी, अविनाश मेंढे, संदीप बागडे, अर्जुन रोहनकर, अजय रोहनकर यांच्यासह समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Mantra Jap and Havan for the Tribute of the Dead ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.