आठ दिवसीय शिबिराचा अनेकांना आरोग्यलाभ

By admin | Published: March 8, 2017 01:14 AM2017-03-08T01:14:45+5:302017-03-08T01:14:45+5:30

सुप्रभात हास्ययोगा क्लबद्वारे दरदिवसी सुभाष गार्डनच्या हुतात्मा परिसरात सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत

Many of the eight-day camps get recuperation | आठ दिवसीय शिबिराचा अनेकांना आरोग्यलाभ

आठ दिवसीय शिबिराचा अनेकांना आरोग्यलाभ

Next

गोंदिया : सुप्रभात हास्ययोगा क्लबद्वारे दरदिवसी सुभाष गार्डनच्या हुतात्मा परिसरात सकाळी ६ ते ८ वाजतापर्यंत नि:शुल्क प्राणायाम, योगासन व हास्यासनचे वर्ग घेतले जाते. सदर क्लबद्वारे आठ दिवसीय शिबिर योग मित्र मंडळ व आयडीबीआय बँकेच्या सहकार्याने प्रशिक्षक विजय सदाफल व सहायोगी प्रशिक्षक राकेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पार पडले. याचा आरोग्य लाभ अनेकांनी घेतला.
समापन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक इंगळे होते. अतिथी म्हणून अ‍ॅड. जयंतीलाल परमार, योगमित्र मंडळाचे सचिव गणेश अग्रवाल, भरत क्षत्रिय, बँक व्यवस्थापक विक्रम बोराडे, स्वप्नील कार्लेकर, नगर सेविका भावना कदम, अफसाना मुजीब पठान, पतंजली जिल्हा प्रभारी लक्ष्मी आंबेडारे उपस्थित होते.
कार्यक्रमात विजय सदाफ व राकेश अग्रवाल यांचा सत्कार शाल व श्रीफळ देवून नगराध्यक्ष अशोक इंगळे व भावना कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अ‍ॅड. जयंतीलाल परमार यांनी योगामुळे होणारे लाभ सांगितले. विक्रम बोराडे यांनी अशा आरोग्यदायी शिबिरांबाबत प्रसन्नता व्यक्त केली. नगराध्यक्ष इंगळे यांनी अशा आरोग्यदायी शिबिरांसाठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
संचालन प्राजक्ता रणदिवे यांनी केले. आभार राजकुमार जैन यांनी मानले. याप्रसंगी बजरंगलाल श्रोती, मुकेश बारई, जगींदर कौर जुनेजा, शंकर तोलानी, प्रवीण गजभिये, रधुनाथ बारसागडे, कुंजबिहारी मोदी, हेमंत कटारे, आनंद गुप्ता, आशीष छितरका, विजय भोयर, नरेंद्र चौधरी, अशोक अग्रवाल, राजेश शिवहरे, पतंजली तालुका प्रभारी आगळे, उर्मिला पटले, ममता बहेकार, रंजिता कनोजिया आदी उपस्थित होते.
 

Web Title: Many of the eight-day camps get recuperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.