कारवाईच्या नावावर अनेकांचे हात ओले
By admin | Published: February 21, 2016 01:01 AM2016-02-21T01:01:29+5:302016-02-21T01:01:29+5:30
गोरठा मार्गावरुन रिसामाकडे जाताना नाल्याच्या शेजारी मुरुम व माती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
अवैध मुरुम व माती चोरी : शेतकऱ्यांची शेती धोक्यात
आमगाव : गोरठा मार्गावरुन रिसामाकडे जाताना नाल्याच्या शेजारी मुरुम व माती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सततच्या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत मुरुम व रेतीची खाण अवैध व्यवसायीकांनी तयार केली आहे. त्यामुळे भविष्यात शेतीला धोका होणार आहे हे निश्चित. फक्त कारवाईच्या नावावर अनेक तलाठी व मंडळ निरीक्षकांचे हात ओले झाले आहेत.
सदर परिसरातील जमीन ही शासकीय आहे. त्यामुळे अडथळा परिसरातील शेतकऱ्यांनी केला नाही. परिणाम एवढा झाला की अवैध मुरुम व माती नेणाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला खोदकाम करुन मोठा खड्डा पडला. भविष्यात मोठी घटना घडल्यास विलंब लागणार नाही.
अनेक वर्षापासून या खाणीतून मुरुम व माती मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने चोरुन नेली जाते. परंतु या मार्गावर अधिकारी सुद्धा फिरकले नाही. त्याचा फायदा मुरुम व माती चोरट्यांना चांगला मिळाला. फक्त रस्त्यावर ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणातून मुरुम माती चोरी गेली. त्या घटनास्थळी जाऊन स्थिती काय आहे. याची कुणीच दखल घेत नाही. किंवा कारवाई करणारे मंडळ अधिकारी ज्याचे संबंध चांगले आहेत त्यांना हिरवा कंदील मिळतो. ज्याचे स्थानांतरण सालेकसा येथे झाले तेच व्यक्ती पुन्हा मंडळ अधिकारी म्हणून आमगाव तालुक्यात काम करतात. एकंदरित सदर व्यक्तीचे स्थानांतरण दुसऱ्या तालुक्यात होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)