अनेकांनी केला हाजरा फॉलला ‘थर्टीफस्ट’ चा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:50 PM2018-01-01T23:50:38+5:302018-01-01T23:52:04+5:30

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळ हाजरा फॉलला रविवारी (दि.३१) थर्टीफस्ट निमित्त पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

Many people have heard Hazara Fallla's 'Thirtiffst' shouting | अनेकांनी केला हाजरा फॉलला ‘थर्टीफस्ट’ चा जल्लोष

अनेकांनी केला हाजरा फॉलला ‘थर्टीफस्ट’ चा जल्लोष

Next
ठळक मुद्देसहा हजारावर पर्यटकांची हजेरी : शंभर युवकाची देखरेख, तीन राज्यातील पर्यटकांचा समावेश

विजय मानकर ।
आॅनलाईन लोकमत
सालेकसा : गोंदिया जिल्ह्यातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळ हाजरा फॉलला रविवारी (दि.३१) थर्टीफस्ट निमित्त पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यात ग्रुपमध्ये पार्टी एन्जॉय करणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांचा सुद्धा समावेश होता.
रविवारी(दि.३१) दुपारपासून पर्यटकांचे हाजराफॉल येथे आगमन होण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत पर्यटकांची गर्दी वाढतच होती. यामुळे हाजरा फॉल परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. हॉजरा फॉलकडे जाणाऱ्या सालेकसा-दर्रेकसा मार्गावर दुचाकी आणि चार चाकी वाहनाने हाजरा फॉलच्या वाटेवर जाणारे लोकच दिसून येत होते. मागील वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हाजरा फॉलला भेट दिल्याची नोंद प्रवेश द्वारावर झाली होती. त्यामुळे सायंकाळच्या वेळेत पर्यटकांची गर्दी आवरणे कठिण झाले होते व काही पर्यटकांनी आपली मनमानी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना हाजराफॉल परिसरातील स्वयंसेवक युवक-युवतींनी आवरण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. हाजरा फॉल परिसरात पर्यटकांच्या मदतीसाठी व सोयी सुविधा पुरविण्यासाठी ५० युवक-युवती स्वयंसेवक म्हणून सतत कार्यरत आहेत. हे युवक-युवती प्रवेशद्वारापासून हाजरा फॉल परिसरापर्यंत वेगवेगळ्या कामासाठी नियुक्त केले आहेत. गेटवर प्रवेश तिकीट देणे, पार्किंगची देखरेख विविध खेळाच्या व साहसिक खेळाच्या ठिकाणी झीप लाईनमध्ये वर पहाडावर आणि परिसरात स्वच्छता ठेवण्याचे काम करतात.
पर्यटकांना तलावातील पाण्यात जाण्यापासून थांबविणे, सेल्फी काढताना सतर्क करणे आदी कामे स्वंयसेवक करतात. यात २४ मुली आणि २६ मुलांचा समावेश आहे. हे सर्व युवक युवती संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाच्या देखरेखीत कार्यरत असतात. यापैकी अनेक मुला-मुलींनी संभावित धोक्यापासून पर्यटकांना वाचविण्याचे प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे. त्यामुळे मागील तीन चार वर्षात या परिसरातील गैरप्रकाराना बºयाच प्रमाणात आळा बसला आहे. हाजराफॉल पर्यटन स्थळ राज्यभरात प्रसिद्ध झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे.
३१ डिसेंबर, १ जानेवारी, मकर संक्रांती, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी तसेच कचारगड यात्रेदरम्यान पर्यटकांची गर्दी अधिक असते. त्यामुळे स्वयंसेवकांना प्रत्येकावर नजर ठेवण्याठी मोठी कसरत करावी लागते.
संयुक्त वनव्यवस्थापन समितीची नजर
मागील वर्षी ३१ डिसेंबरला झालेली गर्दी लक्षात घेता यावर्षी संयुक्त वन व्यवस्थापन समितीसह वन विभागाने विशेष दक्षता घेण्यासाठी अतिरिक्त ३० युवकांची नियुक्ती दोन दिवसासाठी केली होती. वन विभागाने यंदा पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत घेतली. पोलीस दलातील जवान सुद्धा हाजरा फॉल परिसरात तैनात करण्यात आले आहेत. यात महिला पोलिसांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंसेवक व अतिरिक्त स्वयंसेवक आणि पोलीस जवानासह शंभराच्यावर युवक-युवतींचे नियंत्रण होते. यंदा छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील पर्यटकांनी सुध्दा येथे भेट दिली.
दोन दिवस स्वयंपाकाची सूट
हाजराफॉल परिसरात येणाºया पर्यटकांच्या संख्येवर उत्पन्न अवलंबून असतो. त्यामुळे जेवढे जास्त पर्यटक येतात तेवढे उत्पन्न वाढते. या परिसरातील युवकांना रोजगार मिळून उत्पन्नाचे स्त्रोत वाढते. या बाबी लक्षात घेता पर्यटकांच्या आवडीनुसार त्यांना‘थर्टीफस्ट’साजरा करण्याकरिता स्वयंपाक करुन स्रेह भोज करण्याची परवानगी वन विभागाच्या सहमतीने संयुक्त वन व्यवस्थापन समिती दिली आहे. पर्यटकांना स्वयंपाक करुन जेवण करण्यासाठी जुन्या नर्सरी परिसरातील मोकळी जागा जिथे झाडे वैगेरे नाही अशा ठिकाणी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी असे दोन दिवस सूट दिली होती.

Web Title: Many people have heard Hazara Fallla's 'Thirtiffst' shouting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.