नरेंद्र तुरकरसह अनेकांचा भाजप प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 12:13 AM2017-05-28T00:13:22+5:302017-05-28T00:13:22+5:30
पं. दिनदयाल उपाध्याय जनशताब्दी वर्ष व शिवार संवाद सभेच्या माध्यमातून दासगाव येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पं. दिनदयाल उपाध्याय जनशताब्दी वर्ष व शिवार संवाद सभेच्या माध्यमातून दासगाव येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य व माजी जि.प.सदस्य नरेंद्र तुरकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामामुळे प्रभावीत होऊन आ. डॉ. परिणय फुके व माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला.
नरेंद्र तुरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपचे महामंत्री बाळा अंजनकर, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, ग्रामीण तालुका मंडळाचे अध्यक्ष छत्रपाल तुरकर, धनंजय तुरकर, भाजप तालुकाध्यक्ष नंदू बिसेन, भाऊराव उके, राजेश चतुर, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, सुजित येवले उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. परिणय फुके यांनी विकास व परिवर्तन होत असल्याचे सांगून घराघरापर्यंत शासकीय योजना पोहचवीत असल्याचे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुशासनामुळे भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्यास आला आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत आहे. दासगाव, काटी, जि.प.क्षेत्रातील बुथाना मजबूत करण्यासाठी शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यावेळी नरेंद्र तुरकर व इतर पदाधिकाऱ्यांवर टाकली आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले. बनाथर येथील मरार समाजभवनात आयोजित शिवार संवाद सभेत धामणगावचे बजरंग ठाकरे, अनिल पारधी, गणेश मरठे, सिताराम नेवारे, रद्दू सलाम, प्रदीपसिंह चौव्हाण, आशिषसिंह चौव्हाण, तिलक खरे, गजेंद्र नागव, छबीलाल बर्वे यांनी यावेळी प्रवेश केला.