जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘शाळा बंद’
By admin | Published: October 7, 2016 01:50 AM2016-10-07T01:50:00+5:302016-10-07T01:50:00+5:30
सालेकसा/देवरी : औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरूवारी सर्व संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंद पुकारला होता.
सालेकसा/देवरी : औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरूवारी सर्व संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंद पुकारला होता. या बंदला सालेकसा व देवरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा दिवसभर बंद राहिल्या. त्यामुळे विद्यार्थी शाळेत आले. त्यांची हजेरी घेऊन त्यांना सुटी देण्यात आली.
औरंगाबाद येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या दौरान विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात राज्य भरातील शिक्षक मंडळी सहभागी झाली होती. या मोर्चाला हिंसक वळण लागून पोसिलांनी शिक्षकांवर बेदम लाठी हल्ला चढविला. यात अनेक शिक्षक जखमी झाले. तसेच वाढलेल्या हिंसक वळणात पोलीस ही कर्मचारी जखमी झाले. राज्य शासनाने याला प्रकरणामागे शिक्षकांना व शिक्षण संस्थांना जबाबदार धरले. तसेच ३०० शिक्षकांवर कलम ३०७ लावले. यात खुनाचा प्रयत्न मानला जतो. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आणि आज ६ आॅक्टोबर रोजी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आवाहन सर्वच संघटनांनी केला. या आवाहनाला सविस्तर करीत सालेकसा तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.