रेल्वे स्थानक परिसरात अनेक समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 08:54 PM2018-04-05T20:54:45+5:302018-04-05T20:54:45+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.

Many problems in the railway station area | रेल्वे स्थानक परिसरात अनेक समस्या

रेल्वे स्थानक परिसरात अनेक समस्या

Next
ठळक मुद्देउपाय योजनांकडे दुर्लक्ष : प्रवासी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले जाते. मात्र या रेल्वे स्थानकाला विविध समस्यांनी ग्रासले असून त्याचा फटका प्रवाशांना बसत असल्याचे चित्र आहे.
रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागात मुख्य गोंदिया शहर वसलेले आहे. स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी तीन मुख्य मार्ग आहेत. यापैकी सर्वाधिक उपयोगी ठरणारा मार्ग पूर्व दिशेकडून येतो हाच मार्ग सर्वाधिक त्रासदायी ठरत आहे.
सदर मार्ग उखडलेला असून याच मार्गावर एका ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. लहान रस्त्यावरून स्थानकापर्यंत पोहोचणे शक्य नाही. याच मार्गाने रिक्शा व आॅटो सुद्धा ये-जा करतात. इतर वाहन चालकसुद्धा याच मार्गाने आत येतात. येथेच फुटपाथ व्यावसायीक बसतात. जेव्हा एखादी ट्रेन येते तेव्हा प्रवाशांच्या गर्दीमुळे अरुंद रस्त्यामुळे फलाटापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर गुडघाभर पाणी असते त्यातूनच प्रवाशांना मार्ग शोधावा लागतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी रेल्वे विभाग किंवा स्थानिक नगर परिषदेने कुठलेच प्रयत्न केले नाही. गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात अस्तव्यस्त लागलेले आॅटो, सायकल रिक्शा व चारचाकी वाहनांच्या रांगा याचा देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी सायकल स्टॅण्डसाठी रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अर्धी जागा उपलब्ध करून दिली होती. उर्वरित अर्ध्यापेक्षा कमी जागेवर रिक्शा, आॅटो, कार पार्किंगची व्यवस्था केली होती. मात्र या व्यवस्थेत अद्यापही सुधारणा झालेली नाही.
अधिकाऱ्यांची मनमर्जी
रेल्वे विभागाने कोट्यवधी रूपये खर्चून शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम केले. आता या शॉपिंग कॉम्प्लेक्सची अवस्था फार बिकट आहे. या कॉम्प्लेक्समध्ये अद्यापही एकही दुकान सुरू करण्यात आले नाही. रेल्वेने अनेकदा लिलावाचा प्रयत्न केला. या ठिकाणावरून केवळ थोड्याच अंतरावर मार्केट आहे. त्यामुळेच येथे कुणी व्यावसायीक दुकान लावण्यास इच्छुक नाही. येथे जवळच रेल्वे सुरक्षा दलाने एक पोलीस चौक बनविली आहे.
सुरक्षाविषयक सुविधांकडे दुर्लक्ष
रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारालगत पार्सल विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातूनच प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येथे केव्हाही एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Many problems in the railway station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.