मारूती कारसह दारूसाठा जप्त

By admin | Published: August 18, 2015 01:56 AM2015-08-18T01:56:20+5:302015-08-18T01:56:20+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अवैध हातभट्ट्या, मोहा

Maruti car seized with liquor | मारूती कारसह दारूसाठा जप्त

मारूती कारसह दारूसाठा जप्त

Next

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अवैध हातभट्ट्या, मोहा दारू विक्रेते व देशी दारूची विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर धाडसत्र राबविले. त्यादरम्यान दि.१३ ला गोरेगाव परिसरात गस्त घालत असताना एका मारुती कारमधून जाणारी देशी दारू जप्त केली.
दुय्यम निरीक्षक चिटमटवार व जवान मुनेश्वर यांना हिरडामाली-मोहगाव रोडवर मारूती कार (एमपी २२, डी ९३३३३) मधून अवैधरित्या देशी दारू आणली जात असल्याचे लक्षात आले. ही गाडी व दारूच्या १९२ बाटल्या जप्त केल्या.
ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात दु.निरीक्षक चिटमटवार, प्र.निरीक्षक भगत, स.दु.निरीक्षक हुमे, जवान मुनेश्वर, पागोटे, उके व वाहनचालक मडावी यांनी केली. हे धाडसत्र व गस्त अजूनही सुरूच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Maruti car seized with liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.