मुशान झोखाला विकासाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:36 AM2017-12-10T00:36:20+5:302017-12-10T00:36:44+5:30
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर डोंगरकुशीत वसलेले मुशान झोखा गाव अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या गावाच्या विकासाकडे ना लोकप्रतिनिधी ना प्रशासनाचे लक्ष गेल्याचे चित्र आहे.
राजेश मुनिश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर डोंगरकुशीत वसलेले मुशान झोखा गाव अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या गावाच्या विकासाकडे ना लोकप्रतिनिधी ना प्रशासनाचे लक्ष गेल्याचे चित्र आहे.
मुशान झोखा हे गाव खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. या लहानशा गावात केवळ ११ कुटुंब मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन वर्षापूर्वी रस्त्यावर माती काम करण्यात आले. या दोन किमीच्या रस्त्यापैकी १ कि.मी रस्त्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र उर्वरित १ कि. मी. मार्गात खडीकरण न झाल्याने आधीच्या कंत्राटदाराने खडीकरण झाल्याचे दाखवून रक्कमेची उचल केल्याची माहिती उघडकीस आली. मुशान झोखा गावाजवळून एक लहान नाला वाहतो. त्या नाल्यावर दहा वर्षापूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधारा तयार केल्यानंतर एकाही वर्षी या बंधाºयात पाणी साचून राहत नसल्याचे गावकºयांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकºयांसाठी हा बंधारा केवळ नाममात्र ठरत आहे. मुशान झोखा या गावात १०० टक्के आदिवासी समाजबांधव वास्तव्यास आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करुन त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत.
पण जिल्हा परिषदेच्या दुर्लिक्षत धोरणामुळे मुशान झोखा गावात अंगणवाडी केंद्र नाही. गावात विजेची सोय आहे पण विद्युत खाबांवर पथदिव्यांचा अभाव आहे.
हा परिसर नवेगावबांध परिसराला लागून असल्याने या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. वन्य प्राणी गावात येऊ नये यासाठी गावकºयांनी कुत्रे पाळल्याची माहिती आहे.
एका बोअरवेलवर पाण्याची भिस्त
या गावाला लागून नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाची सीमा आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक सौर उर्जेवर चालणारी विंधन विहीर आहे. त्या विंधन विहिरीच्या भरोश्यावर गावकºयांची पिण्याच्या पाण्याची भिस्त भागविली जात आहे.
सायंकाळी ६ नंतर घरबाहेर पडणे कठीण
खडकी गावातून मुशानझोखा गावाकडे जाण्यासाठी १ कि.मी. रस्ता जंगलातून जातो. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे गावकरी वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे सायंकाळी ६ वाजतानंतर गावाबाहेर पडणे टाळतात. मुशान झोखा मार्गावर विद्युत पथदिवे लावण्याची निंतात गरज आहे.
गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष
मुशान झोखा गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या आहे. मात्र बºयाच दिवसांपासून नाल्यांची साफसफाई न केल्याने त्या केरकचºयांने तुडुंब भरल्या आहेत. गावातील समस्या मार्गी लावण्याकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप गावकºयांचा आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी या मुशान झोखा गावात आरोग्य तपासणीकरिता येत नसल्याची खंत एका वयोवृद्ध शेतकºयांनी व्यक्त केली.