शहरात सामूहिक औषधोपचार मोहीम प्रशिक्षण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:40+5:302021-06-27T04:19:40+5:30
यात जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी हत्तीरोग निर्मूलनासंदर्भात राबविण्यात येत असलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची माहिती दिली. ...
यात जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी हत्तीरोग निर्मूलनासंदर्भात राबविण्यात येत असलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची माहिती दिली. हत्तीरोग निर्मूलनासंदर्भात राबविण्यात आलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात रुग्ण संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता यावर्षीदेखील हत्तीरोग विरोधी दोन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, २ वर्षांखालील बालके, अतिगंभीर रुग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन कृमीनाशक अलबेंडोझोल व हत्ती पायरोग प्रतिबंधक हेटरोझन अशा दोन गोळ्या आरोग्य कर्मचारी आपल्या देखरेखीखाली पात्र लाभार्थ्यांना खाऊ घालणार आहेत. यात कोविड प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन करून गृहभेटीचे नियोजन केले आहे. तसेच जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.