गोठ्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:14+5:302021-05-14T04:28:14+5:30
सकाळी १०.३० वाजता गोठ्याच्या छताला आग लागल्याचे गजाजन भांडारकर यांच्या आईला दिसले. त्यांनी लगेच नातू शुभम भांडारकर यांना सांगितले. ...
सकाळी १०.३० वाजता गोठ्याच्या छताला आग लागल्याचे गजाजन भांडारकर यांच्या आईला दिसले. त्यांनी लगेच नातू शुभम भांडारकर यांना सांगितले. त्यांनी गोठ्यात बांधलेल्या जनावरांना धावतच बाहेर काढले. जनावरे बाहेर काढताच आगीने रौद्र रूप धारण केले. गोठ्यात तणसाच्या ३०० वेटा असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. आरडाओरड झाल्याने शेजारचे लोकही आग विझविण्यासाठी धाऊन आले. दिलीप महारवाडे, प्रवीण पटले, पन्नालाल बागडे, रामू महारवाडे, लोकेश रामटेके, भूपेंद्र सोमवंशी, मोरेश्वर कठाणे, गोपाल हरिणखेडे, आशिष पाऊलझगडे, विजय पटले, संजय पटले, राकेश पाऊलझगडे यांनी आगीला विझविण्यासाठी विहिरीतील पाण्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आमगाव नगर परिषदेतील अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. परंतु अग्निशमन वाहन येईपर्यंत गोठ्यातील ८० टक्के साहित्य जळाले होते.