माता व बालकांच्या सुरक्षेसाठी ९८ टक्के महिलांचे मातृवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:27+5:302021-03-09T04:32:27+5:30

नरेश रहिले गोंदिया : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दुष्टीने गर्भवती मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन आरोग्यात सुधारणा ...

Maternal salute of 98% women for the safety of mother and child | माता व बालकांच्या सुरक्षेसाठी ९८ टक्के महिलांचे मातृवंदन

माता व बालकांच्या सुरक्षेसाठी ९८ टक्के महिलांचे मातृवंदन

Next

नरेश रहिले

गोंदिया : माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दुष्टीने गर्भवती मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी तसेच जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू बालमृत्यू दरात घट नियंत्रित व्हावी, यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंमलबजावणी केली जात आहे. जानेवारी २०१७ पासून हा लाभ देण्यात येतो. गोंदिया जिल्ह्याला देण्यात उद्दिष्टांपैकी ९८ टक्के महिलांना लाभ देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत आपत्यासाठी

आहे. या योजनेत दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ आधार सलग्न लाभार्थीच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यात तीन हप्त्यात थेट जमा केली जाते. पहिला हप्ता १ हजार रूपये मासीक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर दिला जातो. किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्व झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार तर प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी,ओपीकी, डीपीटी आपि हिपॅटॅटीस बी वा त्या अनुषंगीक लसीकरणाचा पहिली खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता २ हजार दिला जातो. गोंदिया जिल्ह्यातील ३८ हजार ४७ महिलांना सुरूवातीपासून आतापर्यंत लाभ द्यायचा होता. त्यापैकी ३७ हजार ४३० लाभार्थ्यांना १६ कोटी ५८ लाख २८ हजार रूपयाचा लाभ देण्यात आला.

बॉक्स

आवश्यक कागदपत्रे

-लाभार्थी किंवा तिच्या पतीचे आधारकार्ड

-लाभार्थीचे सलग्न बॅंक खाते

-गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसाच्या आत नोंद

- शासकीय संस्थेत गरोदर काळात तपासणी

- बाळाची जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण केल्यानंतर पूर्तता केल्यानंतर ३० दिवसात लाभाची रक्कम अदा केली जाते.

- पहिला टप्पा-१०००

- दुसरा टप्पा-२०००

-तिसरा टप्पा-२०००

...........

अशी आहे आकडेवारी

सन २०१९

शासकीय संस्थेत प्रसूती- १३६१८

खासगी संस्थेत प्रसूती- ३८३३

सन २०२०

शासकीय संस्थेत प्रसूती- १०८५६

खासगी संस्थेत प्रसूती- २९३५

मातृवंदन योजनेचा लाभ घेतलेल्या महिला

सन २०१९- ९०३८

सन २०२०- ७२५२

..................

तृट्यांमुळे ६१७ लाभार्थ्यांना लाभ नाही

प्रसूतीच्या पहिल्या खेपेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या मातृवंदन योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ६१७ महिलांना मातृवंदन योजनेचा लाभ देण्यात आला नाही. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन सर्व कागदपत्रांची पूर्तता आरोग्य संस्थेमार्फत करणे आवश्यक आहे.

..............

कोट

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करून आम्ही सर्व कागदपत्रे आरोग्य संस्थेत जमा केल्यामुळे आम्हाला तीन टप्यात मातृवंदन योजनेचे ५ हजार रूपये आमच्या खात्यात जमा झाले आहे.

-पूजा नरेश बोहरे, लाभार्थी.

कोट

सरकारी आरोग्य संस्थेतच माझी प्रसूती झाली आहे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत दिलेल्या सूचनांचे पालन केले. आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून उपकेंद्राला कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे टप्याटप्याने माझ्या आत्यात तीन वेळा आलेली एकूण रक्कम ५ हजार रूपये आहे.

-संगीता मरसकोल्हे, लाभार्थी.

Web Title: Maternal salute of 98% women for the safety of mother and child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.