सिंदीटोलात ‘तलाव तेथे मासोळी अभियान’
By admin | Published: July 3, 2017 01:29 AM2017-07-03T01:29:17+5:302017-07-03T01:29:17+5:30
जिल्ह्यातील अधिक तलावांतून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबीयांचे जीवनमान
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : जिल्ह्यातील अधिक तलावांतून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘तलाव तेथे मासोळी अभियान’ उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ तिरोडा तालुक्यातील सिंदीटोला येथे विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्याधिकारी सी.पी. शाहू, नितीन शिराळकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसीलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषी अधिकारी नायेनवाड, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी सलामे उपस्थित होते.
याप्रसंगी मत्स्यपालन सहकारी संस्था सिंदीटोलाचे अध्यक्ष शेंडे, उपाध्यक्ष रविंद्र देवतळे, सचिव बी.एम.तुमसरे, कुवरलाल खुळिसंगे, योगराज शेंडे, मधुकर मारबते, संजय शेंडे, ओमप्रकाश तुमसरे, अनिल देवगडे, रूखमा मारबते, तलाव तेथे मासोळी विभागीय अभियानांतर्गत मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण घेतलेल्या २० व्यक्ती यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी रोहू, कतला, मृगळ व सायिप्रनस जातीच्या माशांचे बीज बोटूकली तलावात अतिथींच्या हस्ते सोडण्यात आले.
जनावरांचे लसीकरण
गोंदिया : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी म्हसगाव येथे श्रीकृष्ण मंदिर परिसरात जनावरांचे लसीकरणाचे कार्यक्रम घेण्यात आले.
यात एकटांग्या, घटसर्प, पी.पी.आर. आजारांबाबत जनावरांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. वाय.सी. पाथोडे, डॉ. सी.डी. जैतवार, रमेश बोपचे, आर.पी. पटले यांनी सेवा दिली. यावेळी प्राध्यापक एस.एस. पुरी, ए.एम. बहेकार उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी पायल दहीवले, लक्ष्मी डहाके, प्रिया अडमाची, पूनम धोणे, माधुरी चवरे, करिश्मा बिसेन, स्रेहा दोनोडे, अश्विनी भोयर, स्वाती भोयर व इतरांनी सहकार्य केले.