नगरपरिषद निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना प्राधान्य ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:43+5:302021-09-19T04:29:43+5:30
गोंदिया : पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी जुळलेली आहे. शेतकरी व कामगारांच्या हिताची कामे व शासनाच्या विविध योजना ...
गोंदिया : पक्षाची विचारधारा सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी जुळलेली आहे. शेतकरी व कामगारांच्या हिताची कामे व शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहाेचली तरच सामान्य जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहील. पक्ष जबाबदारी देणार ती कार्यकर्त्यांनी निष्ठेने सांभाळून जनतेची कामे करावी. पक्ष हा कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची दखल घेत असतो म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची कामे आणि भूमिका सर्वसामान्यापर्यंत पोहोचवून संघटनेला आणखी मजबूत करावे. नगरपरिषदेच्या येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना प्राधान्याने उमेदवारी देण्यात येणार असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
येथील कार्यकर्ते महेश दखने यांच्या निवासस्थानी आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी नागरिकांसोबत विविध समस्यांवर चर्चा केली. बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, नरेश माहेश्वरी, अशोक शहारे, महेश दखने, केतन तुरकर, पुनाजी लिल्हारे, सतीश देशमुख, विनीत सहारे, सचिन शेंडे, हेमंत पंधरे, कुंदा पंचबुद्धे, छोटू पंचबुद्धे, नानू मुदलियार, राजेश कापसे, रमेश कुरील, कुंदा दोनोडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते विशेष म्हणजे, याप्रसंगी तरूण कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असता त्यांचे खासदार पटेल यांनी पक्षाचा दुपट्टा घालून स्वागत केले.