एका पाण्याने जाणार धानपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:21 PM2017-09-26T21:21:08+5:302017-09-26T21:21:22+5:30

यंदा सप्टेंबर महिना संपत येत असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. येत्या सात आठ दिवसांत पाऊस न झाल्यास एका पाण्याने पिके गमाविण्याचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे.

May one go through water | एका पाण्याने जाणार धानपीक

एका पाण्याने जाणार धानपीक

Next
ठळक मुद्देजलाशयातील पाण्यावर भिस्त : सिंचन विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा सप्टेंबर महिना संपत येत असला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत. येत्या सात आठ दिवसांत पाऊस न झाल्यास एका पाण्याने पिके गमाविण्याचे संकट शेतकºयांवर ओढवले आहे. परिणामी शेतकरी चिंतातूर असल्याचे चित्र आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० हजार हेक्टर जमीन पडीक राहिली. यानंतरही ज्या शेतकºयांनी शेतात पीक लावले आणि सिंचन विभागाची मदत झाली. त्यांना देखील आता पावसाअभावी पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. धानाला आता पाण्याची अंत्यत गरज आहे. मात्र वाघ व इटियाडोह विभागाच्या अधिकाºयांनी त्यांना पाणी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यांच्या शेतकºयांना कालव्यांद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. तर मध्यप्रदेशच्या शेतकºयांनाही तेवढेच पाणी द्यावे लागेल. ही सर्वाधिक त्रासदायक बाब आहे. दुसरीकडे पांढराबोडी परिसर टेल वर आहे. या परिसरातील गावांच्या शेतकºयांना पाणी पोहोचविणे चांगलेच कठीण झाले आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात देखील मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे जलाशयांमध्ये शिल्लक असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याकरिता शासन आणि प्रशासनाचा भर आहे. त्यासंबंधीचे निर्देश सुध्दा शासनाने दिल्याची माहिती आहे.
मामा तलावांची स्थिती नाजूक
जुन्या मालगुजारी तलावांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. यापैकी बोपाबोडी, काटी, नांदलपार येथे एक टक्कासुद्धा पाणी नाही. चिरचाडी ६.५८, कोसबीबाकी ३.०४, ककोडी ११.२४, माहुली १२.४५, मेंढा ८.८१, पळसगाव सौंदड ९.४४, तेढा १०.३० टक्के जलसाठा आहे. केवळ गंगाझरी, मोरगाव, माहुकुडा येथील तलाव शंभर टक्के पाणी भरले आहे. मामा तलावांमध्ये एकूण ४१.७९ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ७४.५३ टक्के जलसाठा होता. मध्यम, लघु व जुन्या मालगुजारी तलावांपैकी एकूण ६५ तलावांमध्ये सध्या ३१.१० टक्के जलसाठा झाला आहे.
मागील वर्षीचा आकडा गाठणे कठीण
जिल्ह्यातील २७ तलाव-जलाशये मागील वर्षी १०० टक्के भरले होते. या जलाशयांमध्ये मानागड, रेंगेपार, कटंगी, कलपाथरी, गुमडोह, कालीमाटी, पिपरिया, पांगडी, राजोली, सोनेगाव, उमरझरी, ओवारा, बेवारटोला, भानपूर, फुलचूर, गंगेझरी, खमारी, कोकणा, मालीजुंगा, मुंडीपार, मेंढा, माहुरकुडा, पळसगाव सौंदड, पालडोंगरी, सौंदड, तेढा यांचा समावेश आहे. यावर्षी केवळ तीन तलाव भरले आहेत. मात्र अधिकतर तलाव रिक्त असल्याने शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळत नाही.
जलाशयात अपुरा पाणीसाठा
जलाशयात शिल्लक असलेल्या पाणीसाठा पाहिल्यास तो देखील मोजक्याच प्रमाणात आहे. इटियाडोह ४१.९३ टक्के, शिरपूर २४.९७ टक्के, पुजारीटोला १७.९८ टक्के, कालीसरार जलाशयात ३३.१८ टक्के पाणीसाठा आहे. धापेवाडा प्रकल्पात ५८.५३ टक्के जलसाठा आहे. सध्या शेतकºयांची पाण्याची गरज लक्षात घेता धापेवाडा जलाशयाचे पाणी सोडले जात आहे.
तलाव देखील कोरडीच
जिल्ह्यातील मुख्य ७२ तलाव-जलाशयांपैकी केवळ तीन तलाव शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित ६९ तलावांची स्थिती चिंताजनक आहे. काही जलाशयांमध्ये तर एक टक्कासुद्धा पाणी नाही. मध्यम प्रकल्पाच्या चोरखमारा जलाशयात केवळ ४.९७ टक्के पाणी आहे. कलपाथरीमध्ये ९.८० टक्के जलसाठा झाला. विशेष म्हणजे मध्यम प्रकल्पाच्या ९ तलावांपैकी एकसुद्धा ५० टक्के भरलेला नाही. मागील वर्षी याच कालावधीत या तलावांमध्ये ७६.८२ टक्के जलसाठा होता. तर यंदा लघु प्रकल्पाच्या गुमडोह येथे ४.६०, रिसाला येथे २.२२, ओवारा येथे ३.७६ टक्के जलसाठा आहे. लघू प्रकल्पाच्या २२ तलावांमध्ये केवळ ३१.७० टक्के पाणीसाठा झाला आहे.

Web Title: May one go through water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.