एमसीआयची टीम धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:30 AM2018-08-11T00:30:35+5:302018-08-11T00:32:36+5:30

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) तीन सदस्यीय समिती पुन्हा एकदा गुरूवारी (दि.९) गोंदियात धडकली आहे. समितीने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थी सुविधेवर समितीचा जास्त जोर दिसून आला. शिवाय, समितीने कुडवा येथील महाविद्यालयाच्या बांधकामाबाबत पाहणी केली.

MCI team shocks | एमसीआयची टीम धडकली

एमसीआयची टीम धडकली

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा : विद्यार्थी सुविधेवर दिसला समितीचा जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची (एमसीआय) तीन सदस्यीय समिती पुन्हा एकदा गुरूवारी (दि.९) गोंदियात धडकली आहे. समितीने येथील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, विद्यार्थी सुविधेवर समितीचा जास्त जोर दिसून आला. शिवाय, समितीने कुडवा येथील महाविद्यालयाच्या बांधकामाबाबत पाहणी केली.
तीन सदस्यीय समितीमध्ये ग्वालीयर येथील गजराज मेडीकल कॉलेजचे डॉ. भारत जैन, जामनगर येथील एम.डी.शाह मेडीकल कॉलेजचे डॉ. डी.वर्षावाडा व कर्नाटकातील बेल्लारी येथील विजयनगर मेडीकल कॉलेजचे डॉ. मल्लिकार्जुन एम. यांचा समावेश आहे. ही समिती गुरूवारी (दि.९) सकाळी गोंदियात आली व शुक्रवारीही (दि.१०) त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थेची माहिती घेतली. त्याचप्रकारे, वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत येत असलेल्या केटीएस रूग्णालयात मेडीकलच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बैठक व्यवस्थेची माहिती घेतली.
शिवाय विविध विभागांत काय-काय सुविधा उपलब्ध करविण्यात आल्या आहेत याबाबत विचारपूस केली. कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल विचारणा केली. तसेच आतापर्यंत काय-काय व्यवस्था करण्यात आल्या आहेत व काही व्यवस्था न झाल्यास कशामुळे झाल्या नाही याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनासोबत विचारपूस केली. एवढेच नव्हे तर या समितीने बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील व्यवस्थेचीही पाहणी केली. यादरम्यान अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच येणाºया समस्यांबाबत विचारणा करून त्यांना सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत हे ही जाणून घेतले.
समितीने फुलचूर येथील आयटीआय व पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये असलेल्या हॉस्टलबाबत माहिती घेतली. एवढेच नव्हे तर जवळील ग्राम कुडवा येथील ज्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे त्याबाबत विचारणा केली. त्याचप्रकारे आतापर्यंत बांधकाम कशामुळे सुरू झाले नाही याबाबत विचारणा केली. तर सोबतच स्वत: जाऊन पाहणी केल्याचीही माहिती आहे.
दरवर्षी होतो समितीचा दौरा
एमसीआयची एक समिती दर ६ महिन्यांत मेडिकल कॉलेजचा दौर करते. हा दौरा ५ वर्षे केला जात असून मेडीकल कॉलेजमध्ये आवश्यक सुविधा मिळवून देणे हा या मागचा उद्देश असतो. याबाबत समिती एक गोपनीय अहवाल तयार करून मेडीकल बोर्डाला सादर करते. याच अहवालाच्या आधारावर संबंधित मेडिकल कॉलेजला मंजुरी द्यायची की मंजुरी काढायची याचा निर्णय घेतला जातो. या दौºयात समितीने रूग्णालय परिसरात सुरू नवीन बांधकामांबाबत माहिती जाणून घेतली.

Web Title: MCI team shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.