एका डॉक्टरसारखा असतो मोटारसायकल मेकॅनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:49 AM2019-02-06T00:49:45+5:302019-02-06T00:50:39+5:30

सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

A mechanical mechanic is like a doctor | एका डॉक्टरसारखा असतो मोटारसायकल मेकॅनिक

एका डॉक्टरसारखा असतो मोटारसायकल मेकॅनिक

Next
ठळक मुद्देवर्षा पटेल : टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मोटारसायकल मेकॅनिची सर्वच ठिकाणी मागणी वाढली आहे. मोटारसायकल मेकॅनिक सुद्धा एका डॉक्टरसारखीच सेवा देत असतो, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.
नागपूर आॅटोमोबाईल टू व्हिलर मेकॅनीक असोसिएशन व गोंदिया टू व्हिलर मेकॅनीक असोसिएशन यांच्या संयुक्त स्नेहमिलन कार्यक्रम गोंदिया येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे आ.गोपालदास अग्रवाल, माजी दिलीप बन्सोड, संघटनेचे अध्यक्ष निशीकांत पोहनकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय सिंग, रुपेश नाईक, पीयूष अग्रवाल, विलास पेटकर,बनवारीलाल लिल्हारे, महेश कुबडे उपस्थित होते.
वर्षा पटेल म्हणाल्या, आॅटोमोबाईल क्षेत्रात सुध्दा प्रचंड स्पर्धा असून रोज नवीन बदल आणि ग्राहकांची आवड निवड बदलत आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत व्यावसायीक, मेकॉनीक यांना हे बदल आत्मसात करण्याची गरज आहे. हे बदल आत्मसात न केल्यास ते स्पर्धेत टिकू शकणार नाही असे सांगितले. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून बेरोजगार युवकांनी या क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधण्याचे आवाहन केले.
या वेळी आ.अग्रवाल व बन्सोड यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी नुतन बिसेन, प्रमोद लिल्हारे, प्रकाश फेडर,असरफ खान, घनश्याम धोटे, सुतम अनमोले, भरत मलेवार,संजू वहिले, प्रताप पटले, महेंद्र मेश्राम, रामेश्वर रार्घोते, हरिभाऊ शहारे, इरफान सैयद, साकीर कुरैली, अविनाश ठवकर, सरफराज शेख, महेश हलमारे यांनी सहकार्य केले.

Web Title: A mechanical mechanic is like a doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.