साखरीटोल्यात मेडीकल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 10:14 PM2018-10-04T22:14:59+5:302018-10-04T22:15:32+5:30
येथील मेडीकल दुकानाला आग लागू संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : येथील मेडीकल दुकानाला आग लागू संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्राप्त माहितीनुसार आमगाव-देवरी मुख्य मार्गावरील पोलीस चौकीच्या बाजुला रोहिणी आकाश उर्फ बामेश्वर बावनकर यांच्या मालकीचे विजया मेडीकल स्टोअर्स आहे.
आकाश बावणकर हे बुधवारी रात्री ८.३० वाजता दुकान बंद करुन घरी गेले होते. दरम्यान बुधवारी मध्यरात्री त्यांच्या मेडीकलमध्ये स्फोट झाल्याचा आवाज आला. याच परिसरात राहणारे अंकीत असाटी यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लगेच आरडोओरड करून मेडीकलला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. परिसरातील नागरिकांनी लगेच मेडीकलकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संपूर्ण मेडीकल जळून खाक झाले होते.
मेडीकलला लागेल्या आगीत फ्रीज, लॅपटॉप, कॅम्प्यूटर, स्कॅनर, फर्निचर तसेच विविध प्रकारची औषधी व नगदी २५ हजार रुपये जळून खाक झाले. यात एकूण ९ लाख ५९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान मेडीकलला शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची तक्रार आकाश बावणकर यांनी सालेकसा पोलीस स्टेशन येथे दाखल केली. पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहे.