मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षीच

By admin | Published: June 19, 2015 01:26 AM2015-06-19T01:26:46+5:302015-06-19T01:26:46+5:30

गोंदियातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू होणार नसले तरी पुढील वर्षी ते सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करू, ...

Medical college next year | मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षीच

मेडिकल कॉलेज पुढच्या वर्षीच

Next

गोंदिया : गोंदियातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरू होणार नसले तरी पुढील वर्षी ते सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार नाना पटोले यांनी येथे पत्रकारांना दिली. याचवेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४५० रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोंदियाच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजसंदर्भात उठत असलेल्या वावड्यांवर पडदा टाकताना खा.पटोले यांनी ही माहिती दिली. यावर्षी मेडिकल कॉलेज सुरू न होणे हे सरकारचे अपयश आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, हे या सरकारचे नाही तर आधीच्या सरकारच्या काळातील व्यवस्थेचा दोष आहे. त्यांनी अनेक कामे प्रत्यक्षात न करता त्याचा गवगवाच जास्त केला. त्यामुळे मेडिकल कौन्सिलने अनेक त्रुटी काढल्या. अजूनही काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. आपण खासदार होईपर्यंत जागेचाही प्रश्न मिटलेला नव्हता. मात्र आता बरीच कामे आटोक्यात आली असून पुढील वर्षीपर्यंत मान्यता मिळून मेडिकलसाठी प्रवेश सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गोंदियातील गँगवारच्या घटनेसंदर्भात बोलताना जे कोणी या प्रकरणात गुन्हेगार असतील त्यांना सोडले जाणार नाही, असे सांगून नागरिकांनी अशा व्यवस्थेचा सामूहिकपणे विरोध करून दहशत निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे हाणून पाडावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रदेश उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपच्या जिल्हा कार्यालयात आलेल्या खा.पटोले यांचे सुरूवातीला महामंत्री संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय, जिल्हा महामंत्री दीपक कदम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संजय कुळकर्णी, जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, विरेंद्र जयस्वाल आदींनी स्वागत केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Medical college next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.