मेडिकल कॉलेजला अपुऱ्या प्राध्यापकांचा फटका

By admin | Published: August 7, 2016 12:53 AM2016-08-07T00:53:03+5:302016-08-07T00:53:03+5:30

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश येत गोंदियात यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.

Medical colleges hurt profusors | मेडिकल कॉलेजला अपुऱ्या प्राध्यापकांचा फटका

मेडिकल कॉलेजला अपुऱ्या प्राध्यापकांचा फटका

Next

सर्व प्रकारच्या सुविधा देणार : अर्थमंत्री मुनगंटीवार यांची ग्वाही
गोंदिया : मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश येत गोंदियात यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. परंतु प्राध्यापकांची पुरेशी व्यवस्था नसल्याने वैद्यकीय शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडून संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे मेडिकल कॉलेजमधील कमतरता भरून काढून सर्व सुविधा देण्याचे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना दिले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र अशी इमारत नसल्याने केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार होऊन शासकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावरील जब्बारटोला गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची २५ एकर (१० हेक्टर) जागा मिळाली आहे. त्या जागेवर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशस्त व स्वतंत्र अशी इमारत उपलब्ध होईल.
शरीर रचनाशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र व जीव रसायनशास्त्र हे तीन विषय या मेडिकल कॉलेजला शिकवले जणार आहेत. परंतु या तिन्ही विषयाचे प्राध्यापक अत्यंत कमी आहेत. एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षासाठी आॅगस्ट ते एप्रिल या कालावधीत अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यास प्रत्यक्षात सहा ते सात महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत प्रत्येक विषयाचे एकूण ४२० तास व्याखान व प्रात्याक्षिक होणार आहेत. प्रत्येक विषयाला महिन्याकाठी ३० तास व्याख्यान व ४० तास प्रात्याक्षिके घ्यायची आहेत. या शैक्षणिक सत्रात दर महिन्याला ७० तास शिकवायचे आहे.
मात्र या ठिकाणी प्राध्यापकांचा अपुरा स्टाफ आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनुसार मेडीकल कॉलेजसाठी प्रत्येक विषयासाठी एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, एक सहायक प्राध्यापक आहे.
तीन ट्युटर नेमण्याची सोय असली तरी बऱ्याचदा भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निरीक्षणापुरतेच या स्टॉफ ला नेमण्यात येतो. पदव्युत्तर परीक्षेच्या तयारीत मग्न असल्याने या विभागात शिक्षकी वृत्तीमध्ये अनेकांना स्वारस्य नसते. अश्या परिस्थीतीत एक प्राध्यापक, एक सहयोगी प्राध्यापक, एक सहाय्यक प्राध्यापक हा स्टाफ अपुरा असल्याने येथील प्राध्यापकांवर कामाचा अतिरिक्त भार पडणार आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थी शिक्षण घेणार आहे.
परंतु उर्वरीत १७ विद्यार्थ्यांची निवड शासन राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेतून (नीट) निवड करून पाठविणार आहेत. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था करण्यात आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) हॉस्टेल व केटीएस रूग्णालयाच्या वरील भागात त्यासाठी व्यवस्था करण्यात आली. (प्रतिनिधी)

मंत्रालयात विशेष बैठक
गोंदिया मेडिकल कॉलेजमधील सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाने निश्चित कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत दिल्या. या बैठकीला आ.गोपालदास अग्रवाल, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव मेघा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.प्रवीण शिनगारे, मेडिकल कॉलेजचे डिन डॉ.अजय केवलिया प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आ.अग्रवाल यांनी मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम, श्रेणी १ ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पूर्णवेळ अधिष्ठाता, प्राध्यापकांची नियुक्ती आणि विद्यार्थ्यांच्या होस्टेल सुविधेचा मुद्दा उपस्थित केला.

 

Web Title: Medical colleges hurt profusors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.