मेडिकल की प्राथमिक आरोग्य केंद्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:32 PM2018-11-12T21:32:02+5:302018-11-12T21:32:33+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने बायोकेमेस्ट्री विभाग बंद करण्याची पाळी आली आहे. तर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुध्दा आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याने हे मेडीकल आहे प्राथमिक आरोग्य केंद्र असा सवाल रूग्णांकडून उपस्थित केला जात आहे.

Medical Health Center? | मेडिकल की प्राथमिक आरोग्य केंद्र?

मेडिकल की प्राथमिक आरोग्य केंद्र?

Next
ठळक मुद्देआवश्यक सेवांचा अभाव : बायोकेमेस्ट्री विभाग बंद करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने बायोकेमेस्ट्री विभाग बंद करण्याची पाळी आली आहे. तर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुध्दा आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याने हे मेडीकल आहे प्राथमिक आरोग्य केंद्र असा सवाल रूग्णांकडून उपस्थित केला जात आहे.
गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर यासाठी केटीएस रुग्णालयाची आधीच तयार असलेली प्रयोगशाळा देण्यात आली. यात सर्व आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र जेव्हापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. तेव्हापासून प्रयोगशाळेत विविध साहित्याचा अभाव जाणवित आहे.
येथील प्रयोगशाळेत मागील १५ दिवसांपासून रक्तगट तपासणी होत नसून त्यांच्याजवळ ग्रुपिंग टेस्ट किट उपलब्ध नसल्याची माहिती आहे. तर सीबीसी तपासणी मशिन मागील दोन दिवसांपासून बंद आहे.मधूमेह रुग्णांची रक्त तपासणी सुध्दा मागील काही दिवसांपासून सोलूशन उपलब्ध नसल्याने बंद आहे.
एचबी, लिवर, किडनी यांची तपासणी सुध्दा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत होत नसल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल. छोट्या मोठ्या तपासणीसाठी नागपूर अथवा खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही अशी अपेक्षा रुग्णांना होती. मात्र मागील महिनाभरापासून वैद्यकीय महाविद्यालयात विविध तपासणी करणे बंद असल्याने हे वैद्यकीय महाविद्यालय आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र असा सवाल रुग्णांकडून केला जात आहे.
दोन वर्षांपासून सुविधांचा अभाव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत मागील दोन वर्षांपासून विविध सोयी सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याकडे अनेकदा महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र ठोस निर्णयाअभावी समस्या कायम आहे. वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांमध्ये रोष व्याप्त आहे.

Web Title: Medical Health Center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.