डॉक्टरांच्या रिक्तपदांमुळे मेडिकल ऑक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 AM2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:18+5:30
विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून मेडिकलमधील दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय (मेडिकल) सुरू होवून चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव असून इमारतीचा प्रश्न सुध्दा अजुनही मार्गी लागेला नाही. तर कार्यरत डॉक्टर सुध्दा राजीनामा देऊन परत जात आहे. परिणामी डॉक्टरांच्या रिक्त पदांचे डोंगर वाढत असून या रिक्त पदांमुळे मेडिकलच ऑक्सिजनवर येत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यविषयक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात त्यांची नागपूरला जाण्याची पायपीट कमी व्हावी यासाठी गोंदिया येथे मेडिकल मंजूर करण्यात आले. मेडिकलची स्वतंत्र इमारत तयार होईपर्यंत मेडिकलचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार मागील चार वर्षांपासून या दोन्ही इमारतीतून मेडिकलचा गाडा हाकला जात आहे. मात्र अद्यापही इमारत बांधकामाला सुरूवात झाली नसल्याने मेडिकल व्यवस्थापनाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.विशेष म्हणजे येथील डॉक्टरांची २५ वर पदे पहिलेच रिक्त होती. त्यातच मागील दोन महिन्यात १५ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे मेडिकलच्या समस्येत अधिक भर पडली आहे. ४० वर डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णावर उपचार करताना मोठी अडचण जात आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून मेडिकलमधील दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मेडिकलच्या बाह्यरुगण तपासणी विभागात सध्या दररोज ७०० रुग्णांची तपासणी केली जात आहे. मात्र डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत डॉक्टरांवर सुध्दा ताण वाढत आहे. मात्र अद्यापही ही रिक्त पदे भरण्यासाठी आरोग्य विभागाने कुठलीच पाऊले उचचली नाही.त्यामुळे येथील समस्येत आणखीच भर पडली असून मेडिकलची सेवा आॅक्सिजनवर आल्याचे चित्र आहे.