संघर्षील महिलांना भेटुन त्यांच्या संघर्ष कथा, कविता व लेख लिहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:05+5:302021-08-20T04:33:05+5:30
गोंदिया : महिलांना लिहिण्यासाठी नवीन दिशा देताना तळागाळातील संघर्ष करणाऱ्या महिलांना भेटून त्यांच्या संघर्षाच्या कथा, कविता, लेख, ललित साहित्य ...
गोंदिया : महिलांना लिहिण्यासाठी नवीन दिशा देताना तळागाळातील संघर्ष करणाऱ्या महिलांना भेटून त्यांच्या संघर्षाच्या कथा, कविता, लेख, ललित साहित्य लिहा. यातून दबलेल्या, दुर्लक्षित हजारो महिलांच्या, कथा, गाथा, आत्मकथा जन्मास येईल. साहित्यात नव्या जिवंत व अस्सल साहित्याची भर पडेल, असे प्रतिपादन गोंडवाना दर्शनच्या रचयिता विद्यापीठीय ज्येष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यांनी केले.
आम्ही विश्व लेखिका व संविधान मैत्री संघ या संस्थेच्या वतीने एस.एस.ए. गर्ल्स म्युनिसिपल स्कूलमध्ये आयोजित साहित्य लेखन प्रोत्साहन-सांस्कृतिक बौद्धिक जागृती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. संस्था अध्यक्ष प्रा. डॉ. दिशा गेडाम, उपाध्यक्ष डॉ. सुवर्णा हुबेकर, सचिव प्रा. डॉ. कविता राजाभोज, कार्याध्यक्ष यशोधरा सोनवणे, कोषाध्यक्ष वंदना कटरे, संचालक सदस्य पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले, माधुरी पाटील, मुख्याध्यापिका उमा गजभिये, गौतमा चिचखेडे, किरण वासनिक, सविता बेदरकर, मुख्याध्यापिका अनिता जोशी, मुख्याध्यापक के. एल. पुसाम, हेमलता अहाके, इंदिरा चौधरी, आरती पारधी, मीरा गेडाम, बबिता सलामे, लता मडावी, शीतल कुंभारे, प्रमिला सिंद्रामे, वनिता मडावी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन कावळे यांनी केले. आभार कृपाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी वसंत गवळी, नीलकंठ चिचाम, ओमप्रकाश नागपुरे, रोमेंद्र बोरकर, अतुल सतदेवे, आदींनी सहकार्य केले.
--------------------
विविध स्पर्धांचे आयोजन
या जागृती उपक्रमांतर्गत महिला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून निबंध, काव्य सुमनांजली, वक्तृत्व कला, गोंडी नृत्य, आदी सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात लीना पुसाम, प्रणाली मनोहर, पारूल कोटांगले, सोनम मरस्कोल्हे, नीलम नेवारे, स्नेहा मेश्राम, चेतना रामटेककर, सिया इडपाचे, वैशाली राऊत, दामिनी मरस्कोल्हे, रिता मरस्कोल्हे, प्रेरणा नागपुरे, शुभम अहाके, आदींनी भाग घेतला, तर इंद्रकला बोपचे, उमा गजभिये, भारती कावळे, शताली शेडमाके, किरण वासनिक, कविता राजाभोज, शालू कृपाले, यशोधरा सोनेवाणे, सविता बेदरकर, शुभम अहाके यांनी काव्य सादर केले.