महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेची सभा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:17+5:302021-02-23T04:45:17+5:30
आमसभेला जिल्ह्यातील वनविभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक-वनपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटवृक्षाची व महापुरुषांच्या छायाचित्राचे पूजन ...
आमसभेला जिल्ह्यातील वनविभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक-वनपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटवृक्षाची व महापुरुषांच्या छायाचित्राचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वनविभागात वनांचे व वन्यजीवांचे संरक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एस. रामानुजम होते. उद्घाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोहर चंद्रिकापुरे, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष शैलेंद्र भदाणे, सहायक वनसंरक्षक प्रदीप ए. पाटील, अखिल भारतीय वनाधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष गाजी शेख, संजय भेंडे, माजी केंद्रीय अध्यक्ष विजय मेहेर उपस्थित होते. संजय कटरे यांनी प्रास्ताविकेतून संघटनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. गाजी शेख यांनी देशातील विविध राज्यातील वनरक्षक-वनपाल यांच्या वेतनात असलेले तफावत दूर करून समान पद वेतन या तत्त्वानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली.
.....
संघटनेची कार्यकारी गठित
विभागीय अध्यक्षपदी दीनदयाल डी. मेश्राम, कार्याध्यक्ष हर्षाद पठाण, सचिव मनोज येटरे, कोषाध्यक्ष प्यारेलाल उसेंडी, महिला आघाडीप्रमुख सुरेखा शिवणकर तर सदस्यपदी एम.आर.चौधरी, डी.आर.राठोड, एफ.सी. गावंडे, पी.एम. केळवदकर, एस.एम.पवार, एन.एस.पातोडे, एस.एम. उके, के.डी. खोब्रागडे, ए.डी. शहारे, व्ही.आर. अवस्थी, डी.एल. धुर्वे, जी.आय. लांजेवार, आर.एस. गव्हाने, एम.डब्ल्यू. भांडारकर, एस.आर.श्रीवास्तव, बी.सी. चव्हाण, एम.ए.पटले, एल.एस.चोले, डी.एस.थेर, सी.एस.डोरले, बी.आर. हत्तीमारे, एस.एन.डोये, एस.के. पटले, व्ही.व्ही.येडमे, जी.डब्ल्यू. मोहतुरे, एम.वाय. पाटील, एन. आर.चौधरी, एन.पी. बागुल यांचा समावेश आहे.