राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 08:13 PM2018-04-25T20:13:35+5:302018-04-25T20:13:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवडणूक अधिकारी आ. प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवडणूक अधिकारी आ. प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे दर ३ वर्षात होणारे संगटनात्मक निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील संगटनात्मक निवडणुकीकरिता आ. प्रकाश गजभिये यांची जिला निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारीला पक्षाची सभा घेऊन जिल्ह्यातील तालुका व शहर अध्यक्षांची संगटनात्मक निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक व निवडणूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व निवडणूक अधिकारी व निवडणूक मतदान अधिकाऱ्यांनी यासाठी प्रत्येक तालुक्यात बैठक घेतली.
पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष नियुक्त करण्याचे सर्व अधिकार पक्षाचे नेते खा. प्रफुल पटेल यांना देण्यात येत असल्याचे जिल्ह्यातील सर्व सभांमध्ये घोषित करण्यात आले. त्या अनुषंगाने गोंदियात जिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसकडे खा. प्रफुल पटेल यांनी दिलेल्या सूचनेनुसार संगटणात्मक निवडणुकीचा अहवाल पाठविण्यात आला. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडून या अहवालावर २९ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश गजभिये यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले.
सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, पंचम बिसेन, किशोर तरोणे, केतन तुरकर, अशोक सहारे, कुंदन कटारे, छोटू पटले, प्रेम रहांगडाले, केवल बघेले, डॉ. अविनाश काशीवार, कमलबापू बहेकार, तुकाराम बोहरे, लोकपाल गहाणे, जितेश टेंभरे, राजकुमार एन.जैन व इतर उपस्थित होते.