शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 09:37 PM2019-08-20T21:37:48+5:302019-08-20T21:39:09+5:30
तालुक्यातील ग्राम हिवरा येतील कृषी विज्ञान केंद्रात १३ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. प.जे. कृषी विद्यालयाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम हिवरा येतील कृषी विज्ञान केंद्रात १३ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात पार पडली.
अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. प.जे. कृषी विद्यालयाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर होते. याप्रसंगी विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सहायक संचालक व वरिष्ठ संशोधक डॉ. उषा आर.डोंगरवार, प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ.एन.एस.देशमुख, नाबार्डचे सह जिल्हाव्यवस्थापक निरज जागरे, तालुका कृषी अधिकारी डी.एम.तुमडाम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज नासरे, सुनील सोसे, प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.मानकर यांनी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये कृषीशी निगडीत सर्व विभागांनी मिळून कार्य करणे गरजेचे आहे. किडींच्या नियंत्रणासाठी जैविक किटकनाशक व बुरशीनाशक नागपूर कृषी महाविद्यालयातून उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील सध्याची शेतीची स्थिती जाणून घेताना कृषी विद्यालयातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतील असे निर्देश दिले.
धान पिकाची फेरपालट शक्य असल्यास करावी तसेच गोंदिया जिल्ह्यातील हवामान लाख शेती, फळबाग लागवड व रेशीम शेतीसाठी पोषक असून त्यापासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो असे सांगितले.
डॉ. डोंगरवार यांनी, शेतकऱ्यांनी श्री व पट्टा पद्धतीने लागवड, चिखलनीच्या वेळी शक्य असल्यास गराडीचा पाला गाडावा त्यामुळे धानावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. तसेच विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही, नवेगावबांध व साकोली येथे विद्यापीठ संशोधीत सत्यप्रत बियाणे उपलब्ध असतात. शेतकऱ्यांनी या संशोधीत बियाण्यांची लागवड करावी असे सांगीतले.
डॉ. देशमुख यांनी, भविष्यात कृषी विज्ञान केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. जागरे यांनी, नाबार्डच्या विविध योजनांचा लाभ विभागनिहाय घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले.
तुमडाम यांनी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. कृविके मार्फत शेतकºयांना यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात यावे असे सुचविले. नासरे यांनी, आत्मा यंत्रणेद्वारे राबविण्यात येणाºया योजनांची माहिती दिली व जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांना सेंद्रीय शेती विषयी प्रशिक्षण देण्यात यावे असे सुचविले.
टेंभरे, यांनी शेतातील उत्पादीत मालाची विक्री व्यवस्था यावर चर्चा केली व जिल्ह्यातील काही शेतकºयांकडे धानाच्या प्राचीन व अत्यंत चविष्ट जाती आजही सांभाळून ठेवल्याचे सांगीतले.
संचालन जी.आर.खेडीकर यांनी केल. आभार डॉ. सविता पवार यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. हरिश भोंगाडे, ज्ञानेश्वर पटले, हितेश येळे, धनीराम भाजीपाले, संतोष बिसेन, मनोज कोरे, जीवन जिल्हारे, एम.व्ही.भोमटे, आर.डी.चव्हाण, डॉ. सविता पवार, आर.पी.चव्हाण, सोमनाथ गवते, पी.एन.रामटेके तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.