मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास प्रभावित

By admin | Published: June 2, 2017 01:31 AM2017-06-02T01:31:38+5:302017-06-02T01:31:38+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कलमना-गोंदिया-दुर्ग सेक्शनमध्ये डाऊन लाईनवर कलमना-कामठीच्या दरम्यान

Mega block affected the train journey | मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास प्रभावित

मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास प्रभावित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कलमना-गोंदिया-दुर्ग सेक्शनमध्ये डाऊन लाईनवर कलमना-कामठीच्या दरम्यान ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीच्या कार्यासाठी २, १६ व ३० जून २०१७ तसेच १४ व २८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ११.४५ वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.
यात गाडी (५८११२) इतवारी-टाटानगर पॅसेंजरला निर्धारित वेळेपेक्षा दोन तास विलंबाने सोडण्यात येणार असून, ही गाडी रात्री ९.३० ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. दुर्ग-गोंदिया-कलमना सेक्शनमध्ये अप लाईनवर दुर्ग-रसमडाच्या दरम्यान ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीसाठी ९ व २३ जून तसेच ७ व २१ जुलै रोजी रात्री २०.४० वाजतापासून दुसऱ्या दिवसी १० व २४ जून तसेच ८ व २२ जुलै रोजी रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गवरून रात्री ११.४५ वाजता सुटणारी गाडी (१८२३९) गेवरारोडा-नागपूरला एक तास दुर्गमध्ये नियंत्रित करण्यात येईल व दुर्गवरून रात्री १२.४५ वाजता सुटणारी गाडी (५८१११) टाटा-इतवारी पॅसेंजरला ३० मिनिटे दुर्गमध्ये नियंत्रित करण्यात येईल. ९, २३ जून व ७, २१ जुलैला गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमो व गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड लोकलला दुर्गमध्ये समाप्त करण्यात येईल. तर गाडी (६८७०३) डोंगरगड-गोंदिया मेमो रद्द राहील. याशिवाय गाडी (६८७२४) गोंदिया-रायपूर लोकल तथा गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर लोकल १० व २४ जून २०१७ आणि ८ व २२ जुलै २०१७ रोजी रद्द राहतील.

Web Title: Mega block affected the train journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.