रेल्वेचा मेगा ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:13 PM2017-10-02T22:13:37+5:302017-10-02T22:13:56+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे आवश्यक नॉन इंटर लॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबरपर्यंत केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे आवश्यक नॉन इंटर लॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबरपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर काही प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. यातील काही गाड्या रद्द, काही गाड्या नियंत्रित करण्यात येतील. तर काही गाड्या गोंदिया स्थानकापर्यंत पोहोचणारच नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
यात काही पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात इतवारी-रामटेक (५८८१४) व रामटेक-इतवारी (५८८१३) या गाड्या १३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत तीन दिवस, नागपूर-रामटेक (५८८१०) व रामटेक-नागपूर (५८८११) या गाड्या ३ ते १३ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ११ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या गंतव्य ठिकाणाच्या पूर्वीच समाप्त करण्यात येणार आहेत. यात गेवरा रोड-नागपूर (१८२३९) पॅसेंजर इतवारीपर्यंत ३ ते १३ आॅक्टोबरपर्यंत ११ दिवस, नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस (१२८५६) १३ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुरू, गेवरा रोड-नागपूर (१८२३९) पॅसेंजर ही गाडी १४ व १५ आॅक्टोबरला गोंदियापर्यंतच धावेल, नागपूर-बिलासपूर (१२८५६) इंटरसिटी एक्स्प्रेस १४ व १५ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल, बिलासपूर-नागपूर (१२८५५) इंटरसिटी एक्सप्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारी, नागपूर-बिलासपूर (१८२४०) एक्स्प्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुरू, बिलासपूर-नागपूर (१२८५५) १३ व १५ आॅक्टोबरला गोंदियापर्यंत, नागपूर-बिलासपूर (१८२४०) एक्सप्रेस १४ व १६ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर नागपूर-गोंदिया-नागपूर असा प्रवास करणारे प्रवाशी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. यातील काही प्रमुख गाड्या गोंदियापर्यंत पोहोचणार नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. यात महाराष्टÑ एक्स्प्रेस (११०३९) ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत तब्बल १३ दिवस अजनी रेल्वे स्थानकापर्यंत येईल. तर अप मार्गावर महाराष्टÑ एक्स्प्रेस (११०४०) तब्बल १३ दिवस अजनी स्थानकावरून सुटेल. तसेच मुंबई-गोंदिया (१२१०५) विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत तब्बल १३ दिवस अजनी स्थानकापर्यंतच येईल तथा गोंदिया-मुंबई (१२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत अजनी स्थानकावरूनच सुटेल. यामुळे प्रवाशांना त्रास होणार आहे.