दुर्ग-गोंदिया-कळमना मार्गावर मेगाब्लॉक
By admin | Published: October 14, 2016 02:10 AM2016-10-14T02:10:49+5:302016-10-14T02:10:49+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळांतर्गत दुर्ग-गोंदिया-कळमना अप लाईनवर दुर्ग-रसमडाच्या मध्य ट्रॅकच्या देखरेखीसाठी...
अनेक गाड्या रद्द : गाड्या विलंबाने धावणार
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळांतर्गत दुर्ग-गोंदिया-कळमना अप लाईनवर दुर्ग-रसमडाच्या मध्य ट्रॅकच्या देखरेखीसाठी चार तासांचा मेगा ब्लॉक दि.१४ व पुढील तारखांना केला जाणार आहे.
दिनांक १४ व २८ आॅक्टोबर, ११ व २५ नोव्हेंबरला रात्री ८.४० वाजतापासून तसेच दिनांक १५ व २९ आॅक्टोबर, १२ व २६ नोव्हेंबरच्या रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे १४ व २८ आॅक्टोबर, ११ व २५ नोव्हेंबरला गाडी (१८२३९) गेवरा रोड-नागपूर शिवनाथ एक्सप्रेसला एक तास तसेच १५ व २९ आॅक्टोबर, १२ व २६ नोव्हेंबरला गाडी (५८१११) टाटानगर-इतवारी पॅसेंजरला ३० मिनिटांसाठी दुर्ग स्थानकात थांबविण्यात येणार आहे.
याशिवाय १४ व २८ आॅक्टोबर, ११ व २५ नोव्हेंबरला गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमू, गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड लोकल, गाडी (६८७२३) डोंगरगड-गोंदिया मेमू तसेच १५ व २९ आॅक्टोबर, १२ व २६ नोव्हेंबरला गाडी (६८७२४) गोंदिया-रायपूर लोकल तसेच गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर लोकल रद्द राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)