आठवणीतून जगण्याला बळ मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:37+5:302021-07-12T04:18:37+5:30
सालेकसा : माणूस जगताना अनेक आठवणींचा आधार घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात जगतो. कोरोना महामारीत अनेकांना आई, वडील, भाऊ, बहीण, ...
सालेकसा : माणूस जगताना अनेक आठवणींचा आधार घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात जगतो. कोरोना महामारीत अनेकांना आई, वडील, भाऊ, बहीण, नवरा अशी अनेक नाती असलेल्या आपल्या घरातील व्यक्तींना गमवावं लागलं. मात्र, त्यांच्या आठवणी कुटुंबीयांच्या पाठीशी सदोदित असणार आहेत. या आठवणींमधून जगण्याला बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन ठाणेदार प्रमोद बघेले यांनी केले.
त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशनद्वारे आयोजित एक आठवण आपल्या दारी या उपक्रमप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांत "एक आठवण आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत कोरोना महामारीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भावनिक आधार देऊन त्यांच्या दारात त्यांची एक आठवण म्हणून एक झाड लावून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या आठवणींच्या झाडाचे संगोपन करण्यासाठी साद घालणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प संचालक दिगंबर वाघ उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील गांधीटोला ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या बापुटोला येथील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या स्व. नथमल फटिक यांच्या घरासमोरील परिसरात त्यांच्या आठवणीनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच अरविंद फुंडे, एएसआय बडवाईक, मानकर, तेजराम मानकर, पोलीसपाटील सपना शेंडे, पवन पाथोडे, भीमराव फटिक, सुशीला कुर्वे उपस्थित होते.