‘त्या’ मतिमंद मुलीला केले आईच्या स्वाधीन () (मतिमंद की गतिमंद? कृपया पाहून घेणे.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:02+5:302021-07-25T04:25:02+5:30

सागर काटेखाये साखरीटोला : कोणाचे काही होवो आपल्याला काही देणेघेणे नाही, अशा स्वभावात जगणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. असे ...

‘That’ mentally retarded girl was handed over to her mother () (Mentally retarded or retarded? Please take a look.) | ‘त्या’ मतिमंद मुलीला केले आईच्या स्वाधीन () (मतिमंद की गतिमंद? कृपया पाहून घेणे.)

‘त्या’ मतिमंद मुलीला केले आईच्या स्वाधीन () (मतिमंद की गतिमंद? कृपया पाहून घेणे.)

Next

सागर काटेखाये

साखरीटोला : कोणाचे काही होवो आपल्याला काही देणेघेणे नाही, अशा स्वभावात जगणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. असे असताना पोलिसांनी मात्र रस्त्याने बेवारसपणे फिरणाऱ्या एका मतिमंद मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन करून माणुसकीचा धर्म निभावला. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत साखरीटोला (सातगाव) येथे पोलीस चौकी आहे. या पोलीस चौकीत तीन पोलीस कर्मचारी नेहमी कार्यरत असतात. शुक्रवारी (दि. २३) दुपारी येथील प्रोग्रेसिव्ह युवा संघटनेच्या अंकित मिश्रा, गगन छाबडा, शेफाली छाबडा, अरुण अग्रवाल, संतोष तावाडे या युवकांनी एक मतिमंद मुलगी रस्त्याने बेवारसपणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेळ न घालवता ताबडतोब त्या मुलीचा शोध घेतला. तिला नाश्ता-पाणी देऊन चौकशी केली तेव्हा ती मतिमंद असल्याचे लक्षात आले. मुलगी तरुण असल्याने समाजातील नराधमांच्या हाती लागू नये म्हणून तिची माहिती मिळवली आणि लगेच तिच्या आईशी संपर्क करून सुखरूप त्या मुलीला आईच्या स्वाधीन केले. ती मुलगी आमगाव येथील बनगावची रहिवासी असून, रंजिता जगने असे तिचे नाव आहे. आई चंद्रकला जगने यांनी मुलगी दिसताच मिठी मारली व तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पोलिसांनी समयसूचकता दाखविली नसती तर कदाचित ती इतरत्र भटकत राहिली असती. अलीकडे समाज जीवनात मन सुन्न करणाऱ्या ज्या घटना विशेष करून मुली व स्त्रियांच्या बाबतीत घडतात, त्या घटनांची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु प्रोग्रेसिव्ह संघटनेच्या तरुणांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती मुलगी सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन झाल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे त्यांचे गावात कौतुक होत आहे.

-----------------------------

खाकीतला देवच झळकला

खाकी वर्दी म्हटली की भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळते. खाकीला घेऊन समाजात काही गैरसमजही आहेत. मात्र या खाकी वर्दीतला माणूस कोरोना काळात मागील दीड वर्षापासून सामान्यांच्या सुरक्षेसाठी झटत आहे. यामुळे या खाकीत एक माणूस असतो, त्याच्यातही माणुसकही असते हे दिसून आले. मात्र चंद्रकला यांना त्यांची मुलगी सुखरूप परत करणाऱ्या पोलीस नायक कुवरलाल मानकर, पोलीस नायक तेजराम उईके, पोलीस शिपाई यादव यांच्या रूपाने खाकीत त्यांना देवच झळकला.

Web Title: ‘That’ mentally retarded girl was handed over to her mother () (Mentally retarded or retarded? Please take a look.)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.