धान खरेदी केंद्रासमोर व्यापाऱ्यांचे दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:41 AM2018-10-31T00:41:15+5:302018-10-31T00:41:33+5:30
स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊनमध्ये आधारभूत हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. रितसर धानाची खरेदी सुरु होण्यापूर्वीच गावातील धान्य व्यापारी व काही हितसंबंधीत कार्यकर्त्यांनी धानाचे पोते दर्शनी भागात आणून ठेवल्याचे चित्र मंगळवारी (दि.३०) सकाळीच दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊनमध्ये आधारभूत हमीभाव शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. रितसर धानाची खरेदी सुरु होण्यापूर्वीच गावातील धान्य व्यापारी व काही हितसंबंधीत कार्यकर्त्यांनी धानाचे पोते दर्शनी भागात आणून ठेवल्याचे चित्र मंगळवारी (दि.३०) सकाळीच दिसले. धान खरेदी केंद्र सुरु होण्याची चाहुल लागल्याने काही हुशार कार्यकर्ते व्यापारी आपला हित साधण्यात कमालीची आघाडी घेत असल्याची कैफीयत सामान्य शेतकºयांनी मांडली.
मार्केटींग फेडरेशन अंतर्गत सब एजंट म्हणून दि तालुका खरेदी विक्री सहकारी समितीच्यावतीने येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केद्र मंजूर झाले आहे. गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोडाऊन मध्ये धानाची खरेदी सुरु होणार आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होणार याची चाहुल लागताच व्यापारी व जवळचे हितचिंतक कार्यकर्ते तसेच मोजक्या काही शेतकºयांनी धानाचे बोरे आणून गोडावून परिसरात ठेवल्याचे दिसत आहे. केंद्रासमोर धानाचे ढिग पडून धान खरेदी करण्याचा मूहूर्तच ठरला आहे. तालुक्यात आधारभूत धान खरेदीचा शुभारंभ झाल्याचे ऐकिवात आहे. येथील धान खरेदी केंद्राला मंजूरी मिळाली. केंद्रासमोर सर्वत्र धानाच्या पोत्यांनी जागा व्यापून गेली. हुशार कार्यकर्ते शेतकºयांनी आपले धान सुरक्षित ठेवले. सर्वसामान्य कास्तकार वाटच पाहत आहे. केंद्रासमोर धान असून खरेदी सुरु करण्यास मुद्दाम विलंब लावत आहे अशी कास्तकारांची ओरड आहे. धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाची प्रतिक्षा करावी लागत आहे. शेतकºयांना सहजरित्या धानाची विक्री करता यावी यासाठी उद्घाटनाची वाट न पाता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करायला अडचण कोणती आहे असा प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे.