जिल्ह्याचा पारा ४४.८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:10 PM2019-05-27T22:10:18+5:302019-05-27T22:10:32+5:30
हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.
नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानात सरासरी दोन तीन अंश सेल्सिअसने वाढ होत असते. त्यामुळे नवतपा सुरू झाल्यानंतर नागरिक दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळतात. परिणामी या कालावधी दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते सामसुम असतात. हीच स्थिती यंदा देखील असून यंदा तामनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
गोंदिया जिल्ह्याचा तापमानाचा इतिहास पाहता मागील पंधरा ते वीस वर्षांत यंदा प्रथमच ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड होतो. मात्र यंदा मे महिन्यात हे सर्व रेकार्ड मोडले असून तापमान ४४ अंशावरच आहे. जिल्ह्यात तापमानात मागील गुरूवारपासून सातत्याने वाढ होत असून शनिवारी (दि.२६) सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी आणि सोमवारी पारा पुन्हा ४४.८ अंशावर पोहचला होता.
वाढत्त्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता नागरिकांनी सुध्दा त्यानुसार आपले वेळापत्रक तयार केले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व तयारीच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात होताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. त्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यांना सुध्दा वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे पहाटे ६ वाजतापासून शेतात पोहचून १० वाजेपर्यंत कामे आटोपून शेतकरी घराकडे परतत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक शितपेयाच्या दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.