गुणवंत एजन्ट व हॉकर्सना शिष्यवृत्ती

By admin | Published: June 28, 2016 01:31 AM2016-06-28T01:31:17+5:302016-06-28T01:31:17+5:30

लोकमत वृत्तपत्र दारोदारी टाकताना जिद्दीने अभ्यास करून गुणवंता यादीत झळकलेल्या एजन्ट व हॉकर्स तसेच त्यांच्या

Meritorious agent and scholarship scholarship | गुणवंत एजन्ट व हॉकर्सना शिष्यवृत्ती

गुणवंत एजन्ट व हॉकर्सना शिष्यवृत्ती

Next

गोंदिया : लोकमत वृत्तपत्र दारोदारी टाकताना जिद्दीने अभ्यास करून गुणवंता यादीत झळकलेल्या एजन्ट व हॉकर्स तसेच त्यांच्या गुणवंत मुलांना लोकमतकडून शिष्यवृत्ती देण्यात आली.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्यावर मात करीत पोटाची खडगी भरण्याबरोबर जिद्द, चिकाटीने ज्ञानार्जन करणाऱ्या लोकमतच्या एजेन्ट व हॉकर्सला शिष्यवृत्ती देण्यात आली. काही एजन्टचे मुले-मुली इयत्ता १० वी व १२ वीत होते. ज्या एजेन्ट किंवा हॉकर्सच्या मुलांनी ७० टक्यापेक्षा अधिक गुण मिळविले त्यांना लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शिष्यवृत्ती सोमवारी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय बहेकार, सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, प्रसार विभागाचे पंकज दमदार उपस्थित होते. यावेळी शिष्यवृतीच्या स्वरुपात रोख रक्कम देऊन पुष्पगुच्छाने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन उपसंपादक नरेश रहिले यांनी केले. याप्रसंगी कार्यालयातील सुब्रत पाल, विकास बोरकर, पंकज गहेरवार, राजेश नक्षिणे, देवानंद शहारे, प्रफुल गणवीर, अजय दमाहे, दिव्या भगत, हितेश बंसोड, श्रीकांत पिलेवार, संतोष बिलोणे व गुणवंत विद्यार्थ्याचे पालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

यांचा झाला सत्कार
४इयत्ता १०वीत यश संपादन करणाऱ्यामध्ये सौंदड येथील शिवराम विरेंद्र रहांगडाले ९३.६० टक्के, गोंदियातील दिव्या सुरेश श्यामकुंवर ९०, प्रसन्नजीत विनय मेश्राम ८७.८०, जुली संजय खोब्रागडे ८६.८० टक्के, तिरोडा येथील कृष्णा राजेश हिरापुरे ७९.८०, सौरभ सुरज चव्हाण ७८.२०, निंबा-तेढा येथील काजल बुधराम बिजेवार ७६.६० टक्के गुण मिळविल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Meritorious agent and scholarship scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.