मेरिटोरियस पब्लिक स्कूल (महिला)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:37+5:302021-03-10T04:29:37+5:30
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे होत्या. पाहुणे म्हणून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, शाळा संचालक राणी ...
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे होत्या. पाहुणे म्हणून नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, शाळा संचालक राणी अग्रवाल, शिक्षिका प्रतिनिधी म्हणून प्रिया नागोसे मंचावर उपस्थित होत्या.
मान्यवरांचे स्वागत शुभेच्छा पत्र, रोपटे देऊन व चिमुकल्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने करण्यात आले. यावेळी सादर केलेल्या ‘बेटिया’ या गीताने कार्यक्रमाला अनुरूप अशी वातावरण निर्मिती केली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘मर्दानी अँथम’ या नृत्याने स्त्रियांमधील शक्तीस्वरूपाचे दर्शन उपस्थितांना घडविले. महिला सशक्तीकरण या विषयावर आधारित पथनाट्याने महिलांना समाजात मिळणाऱ्या वागणुकीचे वास्तविक दर्शन घडविले.
यावेळी मेंढे यांनी, माझ्या जीवनातील अविस्मरणीय कार्यक्रमांपैकी हा एक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगून ही बाब स्त्रियांसाठी गौरवाची असल्याचे सांगितले.
लाटे यांनी, स्त्रियांना जीवन जगताना खरोखरच किती संघर्ष करावा लागतो याचा अनुभव दैनंदिन कामकाजाच्या दरम्यान येत असल्याचे सांगून आज स्त्रिया सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोना महामारीच्या काळातही स्त्रियांनी निभावलेली भूमिकासुद्धा त्यांनी स्पष्ट केली.
देशपांडे यांनी, भारतीय संस्कृतीचा वारसा सांगत देवादिकांनीही महत्त्वाची खाती स्त्रियांकडेच सोपविल्याचे सांगत तालुक्यात प्रमुख पदावर स्त्रियाच कार्यरत असून ही स्त्रियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक सहशिक्षिका सोनाली चव्हाण यांनी मांडले. संचालन आस्था बरबटे व नंदनी असाटी या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य तुषार येरपुडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.