मेरिटोरिअस पब्लिक स्कूल (योग)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:14+5:302021-06-22T04:20:14+5:30
याप्रसंगी शाळा संचालक मुकेश अग्रवाल यांनी, योग भारताच्या प्राचीन परंपरेची एक मौलिक देन आहे. योग म्हणजे मन व शरीराच्या ...
याप्रसंगी शाळा संचालक मुकेश अग्रवाल यांनी, योग भारताच्या प्राचीन परंपरेची एक मौलिक देन आहे. योग म्हणजे मन व शरीराच्या एकतेचे प्रतीक आहे. मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील एकरूपता आहे. विचार, संयम व स्फूर्ती प्रदान करणारा आहे. तसेच आरोग्य व कल्याणासाठी समग्र दृष्टिकोन प्रदान करणारा आहे. योग केवळ व्यायामाबाबतच नसून स्वतःमध्ये एकात्मतेचा भाव, जग आणि निसर्गाच्या शोधाबद्दल आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीत ही जाणीव झाल्यास हवामानातील बदलाशी सामना करण्यास निश्चितच मदत होऊ शकते असे सांगितले.
तसेच सहायक शिक्षिका रानू आणि प्रियल यांनी, योगाभ्यासाचे आपल्या दैनंदिन जीवनात काय स्थान आहे व आपण आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश कसा करू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम, पद्मासन, ताडासन, चक्रासन, सूर्यासन व सूर्य नमस्कार आदींचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांकडून करवून घेतले. याप्रसंगी रानी अग्रवाल, प्राचार्य तुषार येरपुडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.