राज्यपालांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:27 AM2021-02-07T04:27:48+5:302021-02-07T04:27:48+5:30

गोंदिया : गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक नमाद ...

Meritorious students felicitated by the Governor | राज्यपालांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

राज्यपालांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Next

गोंदिया : गोंदिया- भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक नमाद महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही जिल्ह्यांतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहणार असून यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील एस.एस.सी. प्रथम आलेल्या गुजराथी नॅशनल हायस्कूलची आस्था अनिलकुमार बिसेन व निष्ठा राजेशसिंह, तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील भिवरामजी विद्यालयाची श्रेया ओमप्रकाश रहांगडाले तसेच आर.जे. लाेहिया विद्यालय सौंदडची विद्यार्थिनी ट्विंकल संजय उके, एच.एस.सी.मध्ये सर्वाधिक गुण उत्तीर्ण झालेली एस.एम. पटेल कनिष्ट विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती प्रेमकुमार भक्तवर्ती, विवेक मंदिर कनिष्ठ विद्यालयाचा जयेश पुरन रोचवानी, बी.एम.ध्ये सर्वाधिक गुण उत्तीर्ण झालेली एस.एस. गर्ल्स महाविद्यालयाची पुष्पा ग्यानसिंग लिल्हारे, बी.काॅम.मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारी नमाद महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिया गोवर्धन नोतानी, बी.एस्सी.मध्ये सर्वाधिक गुण उत्तीर्ण झालेली धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाची साक्षी शैलेंद्र प्रसाद, अभियांत्रिकीमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणारा मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत दिलीप खंडारे, भंडारा जिल्ह्यातील ऋतुजा जागेश्वर वाघाये, पूजा अश्विन मेहता, भाग्यश्री घनश्याम बोरकर, रोशनी पिजानी, रूपाली प्रदीप बुरडे, श्वेता अनिल पडोले आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहरभाई पटेल स्मृती समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकॅडमी, गोंदिया शिक्षण संस्थेच्या वर्षा पटेल, माजी हरिहरभाई पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले आहे.

Web Title: Meritorious students felicitated by the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.