लोहिया विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:34 AM2021-09-08T04:34:39+5:302021-09-08T04:34:39+5:30
अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष जगदीश लोहिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्ष आ.न. घाटबांधे, सदस्य शमीम अहमद सय्यद, मधुसूदन अग्रवाल, ...
अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष जगदीश लोहिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था उपाध्यक्ष आ.न. घाटबांधे, सदस्य शमीम अहमद सय्यद, मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका कल्पना काळे, मंजू डोंगरवार, नालिराम चांदेवार, प्रल्हाद कोरे, भजनदास बडोले, रामकुमार चांदेवार, पुरुषोत्तम लांजेवार, बाबूराव हरणे, कटनकर, गुलाब शहारे, दिलीप शहारे, पंचायत समितीच्या माजी सदस्य मंजू डोंगरवार, पर्यवेक्षिका कल्पना काळे, सहायक शिक्षक जी.एस. कावळे, जे.एम. झोडे, आर.आर. मोहतुरे, एस.यू. पवार, शिक्षिका पी.एस. भेंडारकर उपस्थित होते.
याप्रसंगी लोहिया यांनी समाजात शिक्षकांचे मानाचे स्थान असून, समाजाच्या जडणघडणीत शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. आईप्रमाणे आजीवन संस्कारयुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे समाजाला सन्मार्ग दाखविणारे गुरू बनून लोकल्याणाचे कार्य करा असे मत व्यक्त केले. पाहुण्यांनीही शिक्षक दिनाचे महत्त्व प्रतिपादित केले. निधी शहारे व हेमलता मस्के या विद्यार्थिनींनी गीतांमधून शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. संचालन यू.बी. डोये यांनी केले. आभार चिंखलोंढे यांनी मानले.
------------------------------
या गुणवंतांचा केला सत्कार
याप्रसंगी बारावीच्या परीक्षेत ९० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त गुणवंत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या अंशू भेंडारकर, धीरज भिवगडे, ऋतिका निर्वाण, लीना यावलकर, सम्यक साखरे या विद्यार्थांचा लोहिया यांच्या हस्ते घडी, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.