मेश्राम यांच्या स्मृतिगंध काव्यसंग्रहाचे प्रकाशन थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:01+5:302021-09-06T04:33:01+5:30
काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात कवयित्री मेश्राम यांच्या स्मृतिगंध कविता संग्रहासोबतच तब्बल १७ पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष दादाकांत धनविजय, प्रमुख मार्गदर्शक डॉ. ...
काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात कवयित्री मेश्राम यांच्या स्मृतिगंध कविता संग्रहासोबतच तब्बल १७ पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष दादाकांत धनविजय, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अनिल पावशेकर, प्रा. आनंद मांजरखेडे, मयुर निमजे, डॉ. सोहन चवरे, रेणुका किन्हेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील ३० कवी, कवयित्रींना साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले. राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता खांडेकर यांनी आभार मानले.
सुधा मेश्राम या मागील ४ वर्षांपासून शैक्षणिक, कविता व साहित्य क्षेत्रात मराठी भाषेच्या संवर्धनार्थ मराठीचे शिलेदार समूहासाठी मुख्य सहप्रशासक म्हणून अविरत कार्यरत आहेत. त्यांचे भाषेसाठीचे योगदान अतुलनीय असून, शैक्षणिक दर्जा अधिकाधिक वृद्धिंगत होण्यासाठी त्या नवनवीन उपक्रम समूहासाठी तयार करीत असतात. तसेच समुहाच्या सर्व साप्ताहिक काव्य स्पर्धेत त्या परीक्षक व संकलक म्हणून मोलाचे कार्य करत आहेत. गतसाली मराठीचे शिलेदार संस्थेने त्यांचा जीवन गौरव पुरस्कार तसेच कुसुमाग्रज पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला आहे.